स्वयंपाकघरात स्टीलच्या वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. स्टीलच्या भांड्यांची चमक भांडी जुनी झाल्यावर निघून जाते; पाण्यात असणाऱ्या क्षारांमुळे भांडी गंजायला लागतात.
गंजलेल्या भांड्यात जेवण बनवल्यामुळे आजार होण्याचा धोका असतो. म्हणूनच आज आपण स्वयंपाकघरातील स्टीलच्या भांड्यांवर आलेले गंजाचे डाग साफ करण्यासाठी प्रभावी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
स्टीलच्या भांड्यांवरील गंज काढण्यासाठी १ चमचा बेकिंग सोडा २ कप कोमट पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा. त्यानंतर गंजलेल्या भांड्यामध्ये हे पाणी ओतून 15 मिनिटे राहूद्या नंतर स्वच्छ कापडाच्या किंवा मऊ ब्रशच्या साहाय्याने भांड्यात जिथे गंजलेले डाग पडलेत ती जागा स्वच्छ करा.
नंतर भांडे स्वच्छ पाण्याने धुवा. आणि कपड्याने पुसून ठेवा. आपले भांडे परत पहिल्यासारखे दिसू लागेल. स्टीलच्या भांड्यांवरील गंज काढण्यासाठी कपड्याने थोडे मीठ गंजलेल्या भागावर लावा. नंतर त्यावर लिंबाचा रस लावा. आणि 1 तासभर राहूद्या नंतर दात घासायच्या ब्रशने गंजलेला भाग घासा. असे केल्याने गंज निघून जाईल.
भांड्यांवरील गंज काढण्यासाठी आपण व्हाईट व्हिनेगरचा देखील वापर करू शकता. भांड्याला व्हाईट व्हिनेगर लावण्याआधी आपल्या हातात रबरी हातमोजे घाला. नंतर कपड्यावर व्हाईट व्हिनेगर घेऊन गंजलेल्या भांड्यावर लावा. तासभर राहूद्या नंतर दात घासायच्या ब्रश गंजलेल्या भागावर फिरवा.
नंतर पाण्याने भांडे धुऊन टाका. आपले भांडे परत पाहिल्यासारखे चमकू लागेल. स्टीलची भांडी गंजू नये यासाठी धुतल्यानंतर स्वच्छ कपड्याने कोरडी करायला विसरू नका.
अशीच चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक / फॉलो करा. आपल्याला स्टीलच्या भांड्यांवरील गंज काढण्यासाठी प्रभावी उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.