भूतांचे वास्तव्य असलेला एक किल्ला

भानागड हो बरोबर वाचताय पण तुम्ही जी समजताय ती भानगड नाही तर हा एक राजस्थान जिल्ह्यातील भुईकोट किल्ला आहे. राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यापासून सुमारे ८० कि.मी. अंतरावर अलवर जिल्ह्यात असलेला भानागड किल्ला नेहमीच लोकांच्या कथेचा, आकर्षणाचा, आणि गुढ गोष्टींचा विषय ठरला आहे. या किल्ल्यापासून काही अंतरावर सरिस्का राष्ट्रीय उद्यान आहे. सरिस्का हे वाघ संरक्षित अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे आपल्यापैकी बरेच जण तिथे जाऊन देखील आले असतील.

या किल्ल्यात बरीच मंदिरे आहेत ज्यात भगवान सोमेश्वर, गोपीनाथ, मंगला देवी आणि केशवराय यांची छोटी पण आकर्षक मंदिरे आहेत सध्या काही मंदिर भग्नावस्थेत आहेत. या मंदिराच्या भिंतींवर व स्तंभांवर कोरलेल्या सुबक कोरीव मुर्त्या पाहून अंदाज येतो की हा संपूर्ण किल्ला किती सुंदर आणि भव्य झाला असावा.

भारतीय पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात हे शहर एक प्राचीन ऐतिहासिक स्थळ असल्याचे ठळक पुरावे या ऐतिहासिक ठिकाणी मिळालेले आहेत. सध्या या किल्ल्याची देखभाल भारत सरकार च्या पुरातत्व विभागामार्फत केली जाते. पुरातत्व विभागाने येथे येणाऱ्या पर्यटकांना सक्तीच्या सूचना दिल्या आहेत की सूर्यास्ता नंतर कोणीही या भागात राहू नये. त्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून देखील सक्तीचे पालन केले जातील याची खबरदारी घेतली जाते.

पुरातत्व विभाग या किल्ल्यावर सूर्यास्तानंतर थांबू देत नाही. असं काय दडलं आहे या किल्ल्यामध्ये. भानागड किल्ल्याची कहाणी देखील तितकीच रहस्यमय आणि अत्यंत रंजक आहे. इतिहासात या किल्ल्याचा पहिला उल्लेख आढळतो तो इसवी सन १५७३ मध्ये हा किल्ला आमेरच्या राजा भगवंत दास यांनी बांधला.

हा किल्ला जवळ जवळ ३००वर्ष अजिंक्य राहिला होता. पुढे  सोळाव्या शतकात राजा सवाई मानसिंगाचा छोटा भाऊ राजा माधो सिंग यांनी भानागड किल्ल्याला आपले निवासस्थान बनवले. नंतर च्या काळात भानागड किल्ल्याची ओळख ‘भूतांचा भानगड’ म्हणून ओळखला जाऊ लागला. असं म्हटलं जातं या किल्ल्याची अशी ओळख एका शापामुळे होऊ लागली.

असे म्हणतात की भानागडची राजकुमारी रत्नावती खूप सुंदर होती. त्या काळात राजकुमारीच्या सौंदर्याची चर्चा राज्यभर होत होती. रत्नावतीसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव वेगवेगळ्या राज्यातून येत होते. एकदा रत्नावती राज्यात गावकारभर कसा चालतो हे पाहण्यासाठी गडाबाहेर आली. ती गावांत फिरत असताना एका अत्तराच्या दुकानात पोचली दुकानातील सुगंधी अत्तर घेण्याचा तिला मोह झाला म्हणून तिथे ती थांबली. त्याचवेळी सिंधू सेवडा नावाची व्यक्ती त्या दुकानापासून काही अंतरावर उभी होती. रत्नावती ला पाहताच तो तिच्या रूपावर मोहित झाला. राजकुमारीला मिळवण्यासाठी त्याने काळ्या जादूचा वापर केला.

राजकुमारी रत्नावती च्या सांगण्यावरून त्या दुकानातून भानागड किल्यावर राजकुमारीसाठी अत्तराच्या बाटल्या जाऊ लागल्या. ही गोष्ट जेंव्हा सिंधू सेवडा याला समजली तेंव्हा राजकुमारी रत्नावतीला पाठवण्यासाठी अत्तराच्या ज्या बाटल्या जाणार होत्या त्या बाटलीवर त्याने काळी जादू केली आणि राजकुमारीला वशीकरण करण्यासाठी प्रयत्न केले. पण बाटली राजमहालात येण्यापूर्वीच राजकुमारीला काळ्या जादू बद्दल समजले. राजकुमारीला जेंव्हा अत्तराच्या बाटल्या मिळाल्या तेंव्हा तिने रागाने त्या बाटल्या फोडून टाकल्या.

काळ्या जादूमुळे ती जादू उलटली आणि सिंधू सेवडा मरण पावला. परंतु मरण्यापूर्वी त्याने शाप दिला की या किल्ल्यात राहणारे सर्व लोक लवकरच मरणार आहेत आणि पुन्हा जन्मणार नाहीत. त्यांचे जीव या किल्ल्यात भटकत राहतील. आजच्या २१व्या शतकातही, भानागडमध्ये भूतांचे वास्तव्य आहे अशी भीती आजही लोकांना आहे.

भानागड हा किल्ला आणि किल्ल्याच्या आसपासचा परिसर हा शहर असल्याचं. तसेच हे ठिकाण पुरातन ऐतिहासिक असल्याचे खोदकामानंतर पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (एएसआय) यासंदर्भातील पुरावे मिळाले आहेत. आता हा किल्ला भारत सरकारच्या देखरेखीखाली येतो. किल्ल्याच्या आसपास भारतीय पुरातत्व सर्वेक्षणची टीम (एएसआय) उपस्थित आहे. एएसआयने सूर्यास्तानंतर कोणालाही येथे राहण्यास आजही मनाई केली आहे.

भानागड किल्यावर खरंच भूतांचे वास्तव्य आहे की नाही याबाबत कोणाला च ठोस माहिती नाही. तसेच या किल्ल्यावर सूर्यास्तानंतर का बंदी आहे हे देखील कोणी नाकारत नाही. परंतु ही बंदी का आहे त्याबद्दल देखील कोणी माहिती देत नाही. पण जितकी माहिती मिळाली ती कमी अधिक प्रमाणात अशीच आहे. ज्यांना अधिक माहिती हवी आहे त्यांनी एकदा गुगल वर चक्कर मारावी.

Leave a Comment

You cannot copy content of this page