टाईल्सवर पडलेले तेलकट डाग घालवण्यासाठी सोप्या टिप्स

स्वयंपाकघरातील टाईल्सवर बऱ्याचदा तेल सांडल्यामुळे, भाजी सांडल्यामुळे डाग पडतात. स्वयंपाकघरात जेवण बनवत असताना तेल, भाजी आणि मलाल्याचे हात नकळत टाईल्सवर लागतात आणि टाईल्सवर तेलकट डाग पडतात. म्हणूनच आज आपण टाईल्सवर पडलेले  तेलकट डाग घालवण्यासाठी या काही सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत.

टाईल्सवर पडलेले तेलकट डाग घालवण्यासाठी 2 चमचे बेकिंग सोडा घ्या. त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून जाडसर पेस्ट बनवून टाईल्सवर पडलेल्या डागावर लावा. साधारण 15 मिनिटे तसेच राहू द्या त्यानंतर ओल्या कपड्याने ती जागा स्वच्छ करू शकता.

टाईल्सवर पडलेले तेलकट डाग घालवण्यासाठी थोडेसे विनेगार कपड्यावर घ्या. आणि त्या कपड्याने टाईल्सवर ज्या ठिकाणी डाग पडलेत त्या ठिकाणी पुसून घ्या 15 मिनिटे राहूद्या नंतर पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने आपली फरशी चकचकीत दिसू लागेल.

टाईल्सवर पडलेले तेलकट डाग घालवण्यासाठी 2 चमचे लिंबाचा रस घ्या त्यामध्ये थोडेसे दही मिसळून फरशीवरील तेलकट डागावर लावा. साधारणपणे 10 ते 15 मिनिटे राहूद्या नंतर पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने आपली फरशी चकचकीत दिसू लागेल.

टाईल्सवर पडलेले तेलकट डाग घालवण्यासाठी चमचाभर डीटरजेंट पावडर पाण्यात मिसळा त्यामध्ये अर्धा कप व्हाइट व्हिनेगर मिसळा त्यांतर त्या पाण्याने फरशी पुसून घ्या. आपल्यासाठी आम्ही नियमित महत्वपूर्ण माहिती पोस्ट करत असतो ती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page