आपल्या घरातील पाण्यात असणाऱ्या क्षारांमुळे नळावर पांढरा थर जमा होतो. हा थर पाण्यात असणाऱ्या कॅल्शियम ह्या घटकांमुळे जमा होत असतात. पाण्यात जास्त प्रमाणात कॅल्शियम घटक असल्यास त्यामुळे आपले केस कोरडे पडतात, केसांमध्ये कोंडा होऊ लागतो, केस गळू लागतात, त्वचा रोग होऊ शकतात.
अंगाला खाज सुटू शकते, त्वचा कोरडी पडून खरुज, नायटा सारखे त्वचा रोग होऊ शकतात तसेच असे क्षारयुक्त पाणी जास्त दिवस प्यायल्याने दातांवर डाग पडू शकतात. मु’तखडा आजार होऊ शकतो, जास्त क्षार असलेले पाणी कपडे धुण्यासाठी वापरले तर त्यामुळे कपडे लवकर खराब होऊ शकतात. म्हणूनच आज आपण बाथरूमच्या नळावर असणारे क्षारांचे डाग घालवण्यासाठी सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत
बाथरूमच्या नळावर असणारे क्षारांचे डाग घालवण्यासाठी एक कांदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यानंतर कांद्याचा रस गाळणीने गाळून त्यामध्ये 2 ते 3 चमचे व्हाईट व्हिनेगर मिसळून हे मिश्रण कपड्यावर घ्या त्यानंतर आपल्या हातात रबरी हातमोजे घालून आपण बनवेले मिश्रण बाथरूमच्या नळावर लावा. 5 मिनिटे राहूद्या नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने नळावरील क्षारांचे डाग नाहीशे होतील.
बाथरूमचे नळ चमकण्यासाठी, एका भांड्यात 1 चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा बेकिंग सोडा मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण बाथरूमच्या नळावर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. त्यानंतर एका स्प्रे बाटलीमध्ये 1 कप व्हिनेगर आणि 1 कप पाणी मिसळून, नळावर शिंपडा आणि जुन्या ब्रशने मिश्रण घासून घ्या.
त्यानंतर नळ स्वच्छ पाण्याने धुवा. हा उपाय केल्याने आपल्या बाथरूमचा नळ परत पहिल्या सारखा चमकू लागेल. आपल्याला बाथरूमच्या नळावर असणारे क्षारांचे डाग घालवण्यासाठी सोप्या टिप्स हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.