बटाटे खाण्याचे आरोग्यदायी फायदे

आपल्याकडे बटाट्याची भाजी आवडत नाही असे कुणी लवकर सापडणार नाही. बटाटे उकडून, भाजून, तळून अश्या वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ला जातो. आज आपण बटाटे खाल्याने आपल्याला कोणते फायदे मिळतात याची माहिती घेणार आहोत. त्याच बरोबर आपण बटाट्याचे इतर उपयोग काय करता येतील याची माहिती घेणार आहोत. चला तर जाणुन घेउयात

बटाट्यामध्ये व्हि़टॅमिन सी, व्हिटॅमिन पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, झिंक आणि फॉस्फरस असे शरीराला आवश्यक घटक असतात. बटाट्यांमध्ये फायबरचं प्रमाणही जास्त असतं त्यामुळे पचनशक्ती वाढविण्यासाठी मदत मिळते.

बटाटे पचायला हलके असतात. म्हणून लहान मुलांना त्यांच्या आहारात बटाटे दिले जातात. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. आहारात बटाट्याचा समावेश केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत मिळते.

बऱ्याचदा चेहऱ्यावर अकाली सुरकूत्या यायला लागतात या अश्या सुरकूत्यांपासून दूर राहण्यासाठी बटाटे उपयोगी असतात. यासाठी एक कच्चा बटाटा किसुन घ्या अन तो चेहऱ्यावर लावा नियमितपणे असे केल्याने चेहऱ्यावरील सुरकूत्या कमी होण्यास मदत मिळेल.

चेहऱ्यावर बटाट्याचा तुकडा कापून लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते तसेच चेहरा स्वच्छ आणि मऊ होतो. चेहऱ्यावर बटाट्याचा तुकडा कापून लावल्याने चेहऱ्यावर चमक येते. तसेच चेहरा मऊ होतो.

डोळ्यांखाली येणाऱ्या काळया वर्तुळावर बटाट्याचा तुकडा कापून लावा असे केल्याने डोळ्यांखाली आलेली  काळी वर्तुळ कमी होण्यास मदत मिळते.

आपल्याला बटाटे खाण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page