थंडीच्या दिवसात त्वचा कोरडी झाल्याने, नियमित केस न धुतल्याने त्वचेवर मृत त्वचेचा थर जमा होतो त्यालाच मराठीमध्ये कोंडा आणि हिंदी मध्ये रूसी असे म्हणतात.
केसांमध्ये कोंडा होण्याची अजून हि काही कारण आपण या लेखात जाणून घेणार आहोत तसेच केसांमधील कोंडा दूर होण्यासाठी काही सोपे आणि प्रभावी उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे हि माहिती संपूर्ण वाचा माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा.
वातावरणातील धूळ, प्रदूषण, यामुळे टाळूवर घाण जमा होऊन त्यामुळे कोंडा आणि बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका असतो. तसेच केसांसाठी आपण वापरत असलेल्या केमिकलयुक्त प्रोडक्टमुळे देखील केसांमध्ये कोंडा होण्याचा धोका असतो.
बऱ्याचदा आपण केसांना कलर करतो मात्र तो कलर आपल्या त्वचेसाठी योग्य आहे कि नाही हे तपासत नाही अन मग तो कलर लावल्यावर केसांमध्ये कोंडा व्हायला लागतो.
यामुळेच इथून पुढे जर आपल्याला केसांना कलर लावायचा असेल तर तो तुमच्या त्वचेसाठी योग्य आहे की नाही ते तपासून मगच कलर लावा. आपल्या केसांमध्ये कोंडा होऊ नये यासाठी नेहमी स्वच्छ ठेवा. आता आपण केसांमधील कोंडा दूर होण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊयात
केसांमधील कोंडा दूर होण्यासाठी केसांच्या मुळाशी कोरफड गराचा लेप 30 मिनिटे लावून ठेवा नंतर आपले केस चांगल्या पाण्याने धुऊन टाका असे केल्याने आपल्या केसांमधील कोंडा निघून जाईल. कोरफडमध्ये असणाऱ्या एंटीबॅक्टेरियल आणि एंटीफंगल गुणधर्मामुळे आपल्याला एकदा जरी हा उपाय केला तरी फरक दिसून येईल.
केसांमधील कोंडा दूर होण्यासाठी आपण केसांच्या मुळाशी कांद्याचा रस लावू शकता. कांद्याच्या रसाने थोडीशी आग होईल मात्र केसांमधील कोंडा नाहीसा होईल. (ज्यांना कांद्याचा रस लावल्याने आग होते त्यांनी पहिला उपाय करून बघा) केसांमधील कोंडा दूर होण्यासाठी आपण केसांच्या मुळाशी 30 मिनिटे दही लावून ठेवले तरी कोंडा कमी व्हायला मदत मिळते.
कोंडा होऊ नये यासाठी केस धुण्यासाठी नैसर्गिक शिकेकाई, रिठा अशा गोष्टींचा वापर करा. आपल्याला केसांमधील कोंडा घालवण्यासाठी प्रभावी उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.