तिरुपती बालाजी मंदिराच्या कधीही न ऐकलेल्या आश्चर्यकारक १० गोष्टी

श्री बालाजी मंदिर किंवा श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिर हिंदू धर्मग्रंथांमध्ये गौरवशाली वर्णन केलेले एक मंदिर असून, हे मंदिर “सात टेकडी मंदिर” म्हणून देखील ओळखले जाते. तिरुमाला नगर च्या २६.७५ किमी चौरस क्षेत्रात वसलेले आहे. ऐतिहासिक पुराव्यांनुसार हे मंदिर २००० वर्षांहून अधिक जुने आहे.

लोकांचा असा विश्वास आहे की अडचणी व संकटामुळे तारून हरण्यासाठी तसेच मानव जीवन वाचवण्यासाठी पृथ्वीवर उवतरले होते. तिरुपती बालाजी, हिंदू पौराणिक कथांमधील सर्वात प्रसिद्ध स्थळांपैकी एक आहे, आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात एक भव्य स्थान आहे ज्याची ख्याती देशाविदेशात आहे.

पौराणिक कथेनुसार एकदा महर्षी भृगु वैकुंठात आले आणि ते येताच योगनिद्रामध्ये असलेल्या भगवान विष्णूच्या छातीवर लाथा मारल्या. भगवान विष्णू यांना जाग आली आणि त्यांनी ताबडतोब महर्षी भृगु यांचे पाय धरले आणि आणि महर्षींच्या पायाला काही इजा झाली का ते विचारू लागले. परंतु लक्ष्मी देवी यांना महर्षी भृगु यांची ही वागणूक अजिबात आवडली नाही आणि त्यांनी श्री विष्णूवर आपली नाराजी व्यक्त केली.

नाराज झालेल्या लक्ष्मी देवी वैकुंठ सोडून निघून गेल्या. आणि पृथ्वीवर त्यांनी पद्मावती च्या रुपात पुन्हा जन्म घेतला. जेव्हा भगवान विष्णू यांनी देखील आपले रूप बदलून वेंकटेश्वर म्हणजेच बालाजीच्या अवतार घेतला. पुढे जेंव्हा देवीने स्वीकारल्याप्रमाणे वेंकटेश्वर देवाने पद्मावतीशी विवाह करण्याचा प्रस्ताव दिला. या लग्नासाठी त्यांनी कुबेर देवाकडून कर्ज घेतलं.

लग्नानंतर वेंकटेश्वर देव तिरुमलाच्या टेकड्यांवर राहू लागला, कुबेराकडून कर्ज घेताना, देव वचन देतो की युगाच्या अखेरीस तो आपले सर्व कर्ज फेडेल. तो कर्ज संपेपर्यंत कर्जाची परतफेड करत राहील. देवाने ऋणात राहू नये म्हणून भक्त मोठ्या प्रमाणात संपत्ती देतात जेणे करून देव कर्जमुक्त होऊ शकेल. ही कथा आपल्याला माहीत असेल पण या दहा रंजक कदाचित तुम्हाला माहित नसतील.

१) महाद्वाराच्या उजवीकडे आणि बालाजीच्या डोक्यावर जखमेच्या खुणा आहेत. तसेच बालाजी यांच्या बालरूपात असताना हनुवटीतून रक्त आलं होतं त्यामुळे तेव्हापासून बालाजीच्या हनुवटीवर चंदन लावण्याची प्रथा सुरू झाली.

२) असं म्हटलं जातं की भगवान बालाजी यांच्या डोक्यावर मुलायम रेशमी केस आहेत आणि त्यांचा गुंता होत नाही.

३) मंदिरापासून २३ कि.मी. अंतरावर एक गाव आहे. त्या गावात बाहेरील लोकांना प्रवेश करण्यास मनाई आहे. त्या गावातूनच आणलेली फुले देवाला अर्पित केली जातात व त्याच वस्तू, जसे दूध, तूप, लोणी इत्यादी अर्पण केल्या जातात.

४) भगवान बालाजी यांची मूर्ती गर्भगृहात मध्यभागी उभी आहे, परंतु बाहेरून पाहिल्यावर ते उजव्या बाजूला कोपर्यात उभे आहेत असे भासतात.

५) भगवान बालाजी यांना रोज नवीन पितांबर आणि उपवस्त्र नेसवल जातं जे पुन्हा देवावर चढवलं जात नाही.

६) गर्भगृहात म्हणजे मुख्य गाभाऱ्यात चढलेली कोणतीही वस्तू बाहेर आणली जात नाही, बालाजी मंदिराच्या च्या मागे एक बुरुज आहे आणि तेथे मागे न पाहता त्यांचे विसर्जन केले जाते.

७) बालाजी भगवान यांची पाठ कितीही कोरडी केली ती ओलसर लागते, अन तिथे अत्यंत सूक्ष्म समुद्राचा आवाज येतो.

८) बालाजी भगवंताच्या छातीवर लक्ष्मी देवीचा वास असतो. दर गुरुवारी, भगवान बालाजी दर्शनावेळी चंदनाने सजवले जातात. दुसऱ्या दिवशी चंदन काढून टाकल्यावर त्यावर लक्ष्मीची प्रतिमा अंकित होते. 

९) बालाजीच्या जलकुंडात टाकलेलं निर्माल्य तिरुपतीपासून २० किमी अंतरावर वेरपेडु येथुन बाहेर येतात. १०) मंदिराच्या गर्भगृहात जळणारे दिवे कधीही विझलेले नाहीत.

धार्मिक पर्यटन म्हटले की, घाण, सडलेली फुले, नारळ, करवंट्या, लोकांनी खाऊन टाकलेले उष्टान्न, टाकाऊ पदार्थ, राडा असे चित्र आपल्याकडे काही ठिकाणी सर्रास पाहायला मिळते. मात्र, तिरुपती स्टेशन असो वा तिरुमला डोंगरावरील मंदिरे असो, तेथील हॉटेल परिसरा भोवती सुद्धा कमालीची स्वच्छता पाळण्यात येते.

जागोजागी प्लॅस्टिकच्या कचराकुंड्या ठेवल्यामुळे पर्यटक कचरा कचराकुंडीतच टाकतात. जागोजागी झाडू घेऊन स्वच्छता करणारे कर्मचारी दिसून येतात. यामुळे एवढी गर्दी होऊन सुद्धा स्वच्छता असल्याचे पाहून आश्चर्य वाटते.

Leave a Comment

You cannot copy content of this page