बहुमुखी शिवलिंग असलेलं महाराष्ट्रातील अपरिचित ठिकाण

तुम्ही अनेक जुनी महादेवाची मंदिरे पाहिली असतील. अनेक शिवपिंडी ही पहिल्याअसतील. परंतु ३५९ मुखे असलेलं शिवलिंग आपण बघितले नसेल आज आपण या बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

सोलापूर जिल्ह्यातील हत्तरसंग कुडल या निसर्गरम्य ठिकाणी हे बहुमुखी शिवलिंग आपल्याला पाहायला मिळू शकेल. हे ठिकाण भीमा आणि सीना या नद्यांच्या संगमावर असल्याने या ठिकाणास कुडल अर्थात संगम असं म्हंटलं जातं.

मुख्य शिवलिंगावर महादेवाच्या अनेक रूपांमधील शिल्पांचे अंकन करण्यात आले आहे. साधारणपणे मुख्य शिवलिंग धरून ३६० शिवलिंगे यावर कोरण्यात आलेली आहेत.

याच ठिकाणी असलेल्या श्री संगमेश्वर आणि श्री हरिहरेश्वर या दोन कलापूर्ण मंदिरांना कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांना जोडणारा अध्यात्मिक सेतू असेही म्हटले जाते. यातीलच हजारो वर्ष जुने असलेल्या हरिहरेश्वर मंदिराचे उत्खनन करताना हे बहुमुखी शिवलिंग सापडल्याचे इथले गावकरी सांगतात.

या शिवलिंगाचे खास वैशिट्य म्हणजे यातील प्रत्येक मुख हे दोन मुखांच्या अगदी मधोमध कोरलेल असून यामागे कलाकृती साकार करणाऱ्याची अशी धारणा आहे की वरील मुख्य शिवलिंगावर जर दुग्धाभिषेक झाला तर तो शिवाच्या प्रत्येक जटेवर पडेल.

आपणसुद्धा या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन या कलापूर्ण आणि पवित्र मंदिरांना अवश्य भेट द्या. आपल्याला हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. अशीच माहिती वाचण्यासाठी आमचे शोध इतिहाचा हे फेसबुक पेज लाईक करून ठेवा.

Leave a Comment

You cannot copy content of this page