badluram gane

बदलुराम.. या गाण्यावर भारतीयांसोबत अमेरिकी सैनिकांची पाऊले का थिरकत आहेत?

Mahtvache

सध्या भारतात जे वातावरण आहे त्यावरून भारतातील सैनिकांच मनोधैर्य वाढवणं खूप जास्त गरजेचं पण खरंच भारतीय सैनिकांच वाढेल की नाही माहीत नाही. पण आसाम रेजिमेंट च मार्चिंग गाणं नक्की ऐका त्या गाण्याने सैनिकांचंच नाही तर आपलं ही मनोधैर्य नक्की वाढेल आणि अभिमानही कारण इतक्या प्रतिकूल परिस्थितीत देखील भारतीय सैनिक आपलं रक्षण कसं करू शकतात ते देखील कशाचीही अपेक्षा न करता.

सप्टेंबर २०१९ साली अमेरिकेच्या मॅककार्डमधील जॉइंट बेस लुईस येथे भारत आणि अमेरिकन सैनिकांचा यांच्यात १९ व्या संयुक्त व्यायामादरम्यान दोन्ही देशांचे सैनिक गाण्यावर झोके घेताना दिसले. गाणे होते, ‘बदुरामका बदन जमीन के नीचे रेहता है’ वास्तविक, हे गाणे भारतीय सैन्याच्या आसाम रेजिमेंटचे मार्चिंग गाणे आहे, ज्यावर दोन्ही देशांचे सैनिक अगदी आनंदाने नाचताना दिसत आहेत.

बदलूराम का बदन. ही माहिती वाचून झाल्यावर हे गाणं नक्की ऐका हे गाणं आहे जवान ज्या पद्धतीने गात आणि नाचत शहिद बदलुराम यांना श्रद्धांजली वाहतात. हो आश्चर्य वाटतंय ना एका शहीद झालेल्या जवानाला श्रद्धांजली तीही आनंदात आणि नाचून.

हीच तर खासियत आहेत भारतीय जवानांची. हे गाणं जितके ऐकण्यासाठी छान वाटेल तितकी प्रेरणादायक कथा त्यामागील दडलेली आहे. हे गाणे द्वितीय विश्वयुद्धात जपानी सैन्याबरोबर लढा देणाऱ्या रायफलमन बदलुराम या शहीद सैनिकाला समर्पित आहे. आपल्या पैकी कदाचित काही लोकांना माहीत नसेल पण भारतीय सैनिकाला युद्ध प्रसंगी ठराविक अन्नपुरवठा केला जातो.

द्वितीय महायुद्धात देखील प्रत्येक सैनिकांना दिला जाणार राशन चं पाकीट देण्यात येत असे. परन्तु या युद्धात बदलुराम यांना वीरमरण प्राप्त झाले. शहीद बदलुराम यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या क्वार्टर मास्टर यांनी बदलुराम शहीद झाल्यावर त्यांचे नाव हटविणे विसरला आणि त्यांच्या मृत्यूनंतर सैन्य मुख्यालयात त्याबद्दल माहिती देखील देऊ शकले नाही.

त्याकाळची परिस्थिती लक्षात घेता माहितीची देवाण घेवाण ही पत्रांद्वारे होत असे. त्यांनी नाव लिहिलं जरी असलं तरी कदाचित ते पत्र नेता आणता कागद फाटून ते नाव गहाळ होण्याची शक्यत्या नाकारता येत नाही. परिणामी त्यांच्या नावावर शिधा येणे सुरूच राहिले.

बदलुरामच्या नावावर अतिरिक्त येणारं राशन घेऊन काम केले. परंतु नंतर हे अतिरिक्त रेशन त्याच्या रेजिमेंटसाठी वरदान ठरला. दुसर्‍या महायुद्धात जपानी सैन्याने भारतीय सैनिकांचा पुरवठा खंडित केला.

अशा परिस्थितीत, भारतीय बटालियनने शहीद बदलुराम यांच्या नावाखाली अतिरिक्त रेशन घेऊन दिवस काढले. हे अतिरिक्त रेशन संपूर्ण युद्धासाठी निर्णायक ठरले. नंतर भारतीय सैन्याने पुरवठा पूर्ववत केला. शहीद बदलूराम यांच्या स्मरणार्थ हे गाणे तयार करण्यात आले होते, त्यांनी शहीद झाल्यानंतरही आपल्या बटालियनला मदत केली.

आसाम रेजिमेंट गेली सत्तर वर्षे हे गाणे म्हणत आहे. शिलॉंगमधील आसाम रेजिमेंटच्या मुख्यालयात असलेल्या कसम परेड नंतर नवीन भरती झालेले सैनिक ‘बदलूराम का बदन जमीन के नीचे रेहता है’ हे गाणे गातात आणि त्यावर विशिष्ट ठेक्यावर नाचतात. या गाण्याचे बोल अमेरिकेच्या मार्च जॉन ‘ब्राऊन बॉडी’ या गाण्यावर आधारित आहेत. अमेरिकन गृहयुद्धात हे गाणे बर्‍यापैकी लोकप्रिय होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *