आजकालच्या धावपळीच्या जीवनात, दिवसभर काम केल्यानंतर शारीरिक थकवा येतो बऱ्याचदा अत्याधिक थकवा आल्याने अंगदुखी, हात पाय दुखणे कंबर दुखणे अशा गोष्टी व्हायला लागतात. वेदना होत असल्याने चिडचिड व्हायला लागते.
या अशा गोष्टींमुळे अनेकदा कोणत्याही कामावर लक्ष केंद्रित करणं कठीण होऊन बसतं. या दुखण्यापासून मुक्त होण्यासाठी काही प्रभावशाली घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.
शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी मसाज हा सर्वात सोपा उपाय आहे. काहीवेळा शारीरिक हालचालींच्या अभावामुळे, स्नायू कडक होतात, ज्यामुळे शरीरात वेदना होतात. स्नायूंना आराम देण्यासाठी तुम्ही मसाजची मदत घेऊ शकता. अंग दुखत असल्यावर आपण मोहरीच्या तेलाने मसाज करू शकता. त्यामुळे शरीरावर आलेली सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
दालचिनीमध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात, जे अंगदुखीच्या उपचारांसाठी नैसर्गिक उपाय मानले जातात. यामुळे सांधेदुखी तसेच अंगदुखीपासून लवकर आराम मिळतो. यासाठी एक ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा दालचिनी आणि मध मिसळा. दिवसातून एक किंवा दोनदा ते प्या.
अंग दुखीच्या वेदना कमी होण्यासाठी आपण आले वापरू शकता. यासाठी आले बारीक करून कापडात बांधून घ्या. आता कापड गरम पाण्यात काही मिनिटे ठेवा. थोड्या वेळाने कापड थंड होण्यासाठी ठेवा.
थंड झाल्यावर, कापड प्रभावित भागावर 15 मिनिटे ठेवा. असे २ ते ३ वेळा करा, लवकरच आराम मिळेल. अंगदुखी पासून मुक्त होण्यासाठी तुम्ही हळदीचे दूध घेऊ शकता. यासाठी दूध व्यवस्थित गरम करावे. आता त्यात थोडीशी हळद मिसळून प्या.
अनेकदा रात्री पुरेशी झोप न मिळाल्याने अंग दुखी होते असते. त्यामुळे रात्री पुरेशी झोप घेण्यावर भर द्या. आपल्याला अंगदुखी, हात पाय दुखणे घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.