दुधामध्ये कॅल्शिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी १२, फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात. बदामामध्ये विटामिन ई, झिंक, कॅल्शियम, मॅग्नीशियम, ओमेगा-3, फॅटी अॅसिड्स यासारखे शरीराला आवश्यक अनेक पोषक तत्व असतात. आज जाणून घेऊयात दुधासोबत बदाम खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे.
रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधामध्ये १ चमचा बदामाची पावडर मिसळून पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधामध्ये १ चमचा बदामाची पावडर मिसळून पिल्याने बद्धकोष्ठतेची समस्या भेडसावत नाही. पोट व्यवस्थित साफ होते.
बदामाच्या दुधात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम असते नियमित बदाम दुध प्यायल्याने हाडे मजबूत होण्यास मदत मिळेल. लहान मुलांना रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधामध्ये १ चमचा बदामाची पावडर मिसळून दिल्याने मुलांच्या हाडांची वाढ चांगल्याप्रकारे होते. आणि स्मरणशक्ती ही वाढण्यास मदत मिळते.
बदाम आणि दुधाचे सेवन करणे त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर असते. बदामामध्ये व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात आढळते, जे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असते. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधामध्ये १ चमचा बदामाची पावडर मिसळून दूध घेतल्याने रात्री चांगली झोप लागते.
रोज एक ग्लास बदामाचे दुध पिल्याने त्वचेवर आलेल्या अकाली सुरकुत्या जाण्यास मदत मिळते. ग’र्भवती स्त्रियांनी बदामाचे दूध पिल्याने गर्भाच्या वाढ चांगल्याप्रकारे होते.
आपल्याला दुधासोबत बदाम खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.