अवघड जागी खाज येणे घरगुती उपाय

दिवसभर आपण काम करतो दिवसभरात आपल्याला आलेला घाम आपल्या कपड्यांनी शोषलेला असतो. घरी आल्यानंतर लगेच कपडे बदलून अंघोळ न केल्याने, ओल्या अंडरवेअर घातल्याने, दररोज अंघोळ न केल्याने शरीरावरील धूळ – माती निघत नाही, अंघोळीसाठी वेगळा टॉवेल न वापरल्याने अंगाला खाज यायला सुरुवात होते.

आज आपण अवघड जागी खाज येत असल्यास आराम मिळण्यासाठी कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो हे जाणून घेऊयात. अंगाला खाज येणे हा संसर्गजन्य आजार असल्याने आपल्या अंगाला खाज येत असल्यावर इतरांचे टॉवेल वापरु नका.

ओल्या अंडरवेअर वापरू नका. आपल्याला अत्याधिक घाम येत असेल तर कामावरून आल्यानंतर अंघोळ करा. अंघोळीच्या पाण्यात एन्टीसेप्टिक लिक्विड टाकून अंघोळ करा. आपल्याला येणारा घाम चांगल्याप्रकारे शोषून घेण्यासाठी सुती कपडे वापरा.

अंगाला खाज येऊ नये यासाठी अंघोळीच्या पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा नक्की मिसळा. बेकिंग सोडा घालून त्यापाण्याने अंघोळ केल्याने अंगाला येणारी खाज थांबायला मदत मिळते.

तुळशीच्या पानांची पेस्ट बनवून खाज येत असलेल्या ठिकाणी लावल्यास खाज येणे थांबते. तुळशीच्या पानांमध्ये असणाऱ्या एन्टीमायक्रोबायल गुणधर्मांमुळे बॅक्टेरियल आणि फंगल इन्फेक्शनपासून आराम मिळतो.

अंगाला येणारी खाज थांबण्यासाठी तुरटी पावडर 1 चमचा आणि 1 चमचा हळद पावडर एकत्र करून त्यामध्ये थोडसे पाणी मिसळून पेस्ट बनवून खाज येत असलेल्या जागेवर लावा. असे केल्याने येणारी खाज थांबायला मदत मिळते.

आपल्याला अवघड जागी खाज येणे घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page