आजकाल प्रदूषित वातावरणामुळे श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात होत आहेत. रस्त्यांवरील वाहनांचा धूर आणि वसाहतींच्या आजूबाजूला असणाऱ्या कारखान्यांमधून निघणारा विषारी वायू वातावरण प्रदूषित करण्याचे काम करत आहे.
विषारी रासायनिक वायू श्वासासोबत शरीरात पोहोचल्यावर फुफ्फुसावर घातक परिणाम होऊन दमा, अस्थमा असे आजार होऊ शकतात. तरुणांमध्ये वि’डी, सिगा’रेट मधून निघणाऱ्या विषारी धुरामुळे देखील श्वसनाचे आजार होण्याचा धोका असतो. जास्त काळ थंड पदार्थ खाल्ल्याने कफ जुना होऊन फुफ्फुसात जमा झाला तर त्यामुळे दम्याचा त्रासही होऊ शकतो.
आता आपण अस्थमा आजाराची लक्षणे समजून घेऊयात अस्थमा या आजारात श्वास घ्यायला त्रास होतो, श्वास घेताना घरघर आवाज येतो, दम्याचा त्रास सुरु झाल्यावर बसताना आणि झोपताना अस्वस्थता जाणवणे, घशात आकुंचन होत असल्यासारखे जाणवते, अस्थमा ह्या आजारात डोके जड होते, चेहऱ्यावर घाम येतो, हातपाय थंड पडतात, मानसिक अस्वस्थता जाणवते, दम्याचा त्रास होणाऱ्याला श्वास घ्यायला खूप त्रास होतो.
जेव्हा रुग्ण श्वास घेतात तेव्हा स्वच्छ हवा म्हणजेच ऑक्सिजन आत घेतला जात नाही. याचे कारण असे की त्यांचा घसा आणि फुफ्फुसे घट्ट आकुंचन पावलेली असतात.
खोकताना आणि श्वास घेताना श्लेष्मा आल्यास थोडा आराम मिळतो. रात्री झोपल्यानंतर दम्याचा त्रास वाढू शकतो, दमा आजार असल्यास छातीत जमा झालेला कफ सहजासहजी निघत नाही. छातीत जमा झालेला कफ निघत नसल्यामुळे आणि श्वास घ्यायला अडचण येत असल्याने चीड चीड वाढते. चेहऱ्याला घाम येऊ लागतो.
दम्याचा त्रास होत असल्याने रक्त शुद्ध करण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे रक्त देखील अशुद्ध होते. त्वचा निळी पडायला लागते. दमा हा आजार अनुवंशिक आजार असल्याने घरातील वडीलधारी मंडळी, आजोबा किंवा आजी यांना हा आजार असेल तर त्यांच्या मुलांनाही हा आजार होऊ शकतो.
दमा आजार होण्याची कारणे दूर केल्याने अनेक वेळा रुग्ण कायमचा निरोगी होतो. म्हणून दमा आजार कोणत्या कारणांमुळे आपल्याला झाला आहे हे शोधून त्यावर उपचार केल्यास दमा आजार बरा होऊ शकतो. दमा, अस्थमाच्या रुग्णांना आराम मिळण्यासाठी आपण पुढे दिलेल्या गोष्टी करू शकता.
दम्याचा त्रास कमी होण्यासाठी नियमित प्राणायाम करा, प्राणायाम केल्याने, अनुलोम विलोम केल्याने श्वासनलिका आणि फुफ्फुसात जमा झालेला कफ निघून जायला मदत मिळते. दम्याचा त्रास असणाऱ्यांनी घर साफ करताना तोंडाला मास्क किंवा रुमाल लावा. घर नेहमी स्वच्छ ठेवा जेणेकरून धुळीच्या कणांची ऍलर्जी होणार नाही.
नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आपल्याला अस्थमा आजार होण्याची कारणे, अस्थमा आजाराची लक्षणे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा.
दमा, अस्थमा आजार असल्यास आहारात कोणकोणत्या गोष्टी खाल्या तर चालू शकते तसेच कोणकोणत्या गोष्टी खाणे वर्ज्य असते हि माहिती आपल्याला हवी असल्यास कमेंटमध्ये सांगा. आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.