आशिया खंडातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण महाराष्ट्रात आहे

जुन्नरचं एक वैज्ञानीक महत्व म्हणजे खोडदला असलेली महाकाय रेडिओ दुर्बीण! खगोलशास्त्रात भारताने जी काही आपली ओळख निर्माण केली आहे त्यामध्ये याक्स शक्तीशाली रेडिओ दुर्बीणीचे महत्वपुर्ण योगदान आहे. जागतीक पातळीवउर ही दुसर्‍या क्रमांकाची शक्तीशाली रेडिओ दुर्बीण मानली जाते.

डोळ्यांनी निरीक्षण करायच्या ऑप्टिकल दुर्बिणीने केलेल्या निरीक्षणांना मर्यादा असल्याने हल्ली खगोलशास्त्राच्या अभ्यासाठी रेडिओ दुर्बिणीचा वापर होतो. प्रत्येक ग्रह, तारा स्वतःमधून विविध तरंगलांबीच्या चुंबकीय लहरी सर्वत्र सोडतो. या लहरींच्या अभ्यासावरून त्या ग्रहाचे वा ताऱ्याचे चांगल्या प्रकारे निरीक्षण करता येते.

या लहरी पकडण्यासाठी रेडिओ दुर्बिणीचा वापर होतो. अशा दुर्बिणीमुळे इतर तरंगलांबींपेक्षा आखुड असलेल्या रेडिओ तरंगलांबीच्या (१ मीटर) लहरींचे संकलन व अभ्यास करणे सोईस्कर झाले.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा यांनी भारतातील डॉ. विक्रम साराभाई यांना अंतराळ संशोधनासाठी, डॉ. सिद्दिकींना मूलभूत संशोधनासाठी तर डॉ. गोविंद स्वरूप यांना रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमीसाठी योगदान देण्याविषयी आवाहन केले. डॉ. गोविंद स्वरूपांनी या शक्तिशाली दुर्बिणीची संकल्पना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींसमोर मांडली व तिला मान्यता मिळविली.

खोडदच्या परिसरात रेडिओ लहरींना प्रभावित करू शकतील अशा इतर चुंबकीय लहरींचे प्रमाण अतिशय नगण्य असल्याने चुंबकीय लहरींचे संकलन सोपे व अचूक होऊ शकणार होते. हा भाग भूकंपप्रवण क्षेत्राच्या बाहेर होता. तसेच पुण्यापासून दळणवळणासाठी सुलभ होता. त्यामुळे रेडिओ दुर्बिणींसाठी खोडदची निवड केली गेली.

प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम १९८२-८३ च्या सुमारास सुरू झाले व १९९४ च्या सुमारास पूर्ण झाले. या प्रकल्पात अवकाशातून येणाऱ्या रेडिओ लहरी पकडण्यासाठी ४५ मीटर व्यासाच्या एकूण ३० अँटेना उभारल्या गेल्या. एकूण ३० पैकी चौदा अँटेना खोडदमध्ये तर इतर वाय आकाराच्या १६ अँटेना आजूबाजूच्या २५ किलोमीटरच्या परिसरात उभारल्या आहेत.

ज्या आकाशस्थ वस्तूपासून येणाऱ्या लहरींच्या स्रोताचे निरीक्षण करायचे आहे त्या स्थानाकडे सर्व अँटेनांच्या तबकड्या वळविल्या जातात. या तबकड्या अवकाशातून येणाऱ्या चुंबकीय लहरी परावर्तित करून जोडलेल्या रिसीव्हरकडे पाठवतात. व तिथून त्या पुढील संशोधनासाठी, ऑप्टिकल फायबर केबलद्वारे मुख्य प्रयोगशाळेतील संगणकाकडे पाठवल्या जातात. याचा अर्थ असा की या सर्व डिश वेगवेगळ्या नव्हे तर एकच अँटेना म्हणून अप्रत्यक्षरीत्या वापरल्या जातात.

पुणे जिल्ह्य़ात नाराजायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे खगोलवैज्ञानिकांनी विश्वातील दोन महत्त्वाच्या चमत्कारिक खगोलीय घटनांचा शोध लावला आहे. त्यात दोन जास्त वस्तुमानाची कृष्णविवरे व पृथ्वीपासून दोन अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या महाकाय दीर्घिकांची टक्कर यांचा समावेश आहे. दोन्ही घटना अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले.

नासाची चंद्रा क्ष किरण दुर्बीण व पुण्यातील जीएमआरटी दुर्बीण यांनी नोंद केलेल्या माहितीच्या आधारे असे निष्पन्न झाले, की दोन महाकाय दीर्घिकांच्या विलनीकरणात एक महाकाय कृष्णविवर वाहवत गेले; अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने या चमत्कारिक घटनेचा पडताळा आला आहे, असे हार्वर्ड स्मिथसॉनियन सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रोफिजिक्सचे रेनॉट व्हान व्हीरन यांनी सांगितले.

कृष्णविवर व दोन महाकाय दीर्घिकांची टक्कर यांचा संबंध आम्ही प्रथमच शोधला आहे असे त्यांनी सांगितले. आबेल ३४११ व आबेल ३४१२ या दीर्घिका समूहांची टक्कर पृथ्वीपासून २ अब्ज प्रकाशवर्षे अंतरावर झाली.

दोन्ही दीर्घिका समूह जास्त वस्तुमानाचे असून त्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या दशलक्ष अब्ज (शंख) इतके आहे. धूमकेतूच्या आकाराच्या दोन क्ष किरण शलाका चंद्रा दुर्बिणीने शोधल्या असून त्या एका दीíघकेतील गरम वायू दुसऱ्या दीर्घिकेतील गरम वायूत मिसळताना बनल्या आहेत.

केक ऑब्झर्वेटरी व जपानच्या सुबारी दुर्बीणीने जी प्रकाशीय माहिती दिली आहे त्यात दीर्घिका सापडल्या आहेत. प्रत्येक दीíघका समूहात किमान एक गिरकी घेणारे अतिजास्त वस्तुमानाचे कृष्णविवर असून त्यामुळे अतिशय घट्ट बांधणी असलेले चुंबकीय नळकांडे तयार झाले आहे.

शक्तिशाली चुंबकीय क्षेत्रे त्याच्याशी निगडित असून त्यामुळे कृष्णविवरात जाणारा गरम वायू दुसरीकडे जाऊन ऊर्जायुक्त उच्च वेगाचे जेट प्रवाह तयार झाले. हे त्वरण असलेले सुपरसॉनिक लहरींमुळे आणखी त्वरण धारण करतात.

दीर्घिकातील जास्त वस्तुमानाचे वायूमेघ एकमेकांवर आदळल्याने सुपरसॉनिक लहरी तयार होतात. हे पृथ्वीच्या निकटच्या कक्षेत एक अग्निबाण सोडणे व नंतर पुन्हा विस्फोटाने प्रक्षेपकाने तो सौरमालेत दूरवर पाठवण्यासारखे आहे, असे फिलीपी अंद्रादे सांटोस यांनी सांगितले.

यातील कण हे जास्त ऊर्जा धारण करणारे असून या शोधामुळे दीर्घिका संशोधनातील एक कोडे उलगडले आहे. आबेल ३४११ व आबेल ३४१२ या दीर्घिकासमूहांचा शोध जीएमआरटी दुर्बिणीमुळे लागल्याने विश्वात लाखो प्रकाशवर्षे अंतराचे रेडिओ लहरींचे पट्टे का पसरलेले असतात याचे मूळ शोधता आले आहे.

दीर्घिका समूहांच्या दरम्यान गेली कोटय़वधी वर्षे काही लहरी प्रवास करीत असून त्यामुळे रेडिओ लहरीतील ऊर्जाभारित कण तयार होतात. हे संशोधन ‘नेचर अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page