जेवण केल्यानंतर चिमुटभर बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे

आपल्या इथे हॉटेलमध्ये जेवण केल्यावर शेवटी बडीशेप खायला देतात; कारण हॉटेलमधील जेवण पचायला जड असते. बडीशेप खाल्याने जेवण पचायला मदत मिळते. आज आपण जेवण केल्यानंतर चिमुटभर बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

बडीशेपमध्ये कॅल्शिअम, सोडीअम, फॉस्फरस, लोह, पोटॅशिअम, विटामिन सी, अशी शरीराला आवश्यक खनिज असतात. जेवणामध्ये कांदा, लसून, मुळा अशा गोष्टी असल्यास त्याच्यामुळे तोंडाला वास येतो. जेवण केल्यानंतर बडीशेप खाल्याने तोंडाला वास येत नाही.

जेवण केल्यानंतर बडीशेप खाल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. 2 चमचे बडीशेप कपभर पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने कफ, एसीडीटी, गॅस होणे यापासून मुक्ती मिळते. जेवण केल्यानंतर थोडीशी बडीशेप खाल्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या खनिज द्रव्यामुळे दृष्टी चांगली होते.

तळ पायांची आग होत असल्यास 2 चमचे बडीशेप आणि 2 चमचे धने रात्रभर पाण्यात भिजवून ते पाणी गाळून त्यामध्ये थोडीशी खडी साखर मिसळून प्या हा उपाय आठवडाभर केल्याने पायांची होणारी जळजळ थांबते.

लघवी करताना जळजळ होत असल्यास पाण्यात बडीशेप भिजवून ते पाणी दिवसातून 3 वेळा प्या. असे केल्याने लघवी करताना होणारी जळजळ, उन्हाळी लागणे या गोष्टींपासून आराम मिळतो.

मा’सिक पाळी वेळेवर येत नसल्यास अथवा मासिक पाळी येण्यापूर्वी खूप वेदना होत असल्यास थोडीशी बडीशेप गुळाच्या खड्यासोबत खा. यामुळे मासिक पाळी वेळेवर येऊ लागते; आणि मासिकपाळी दरम्यान वेदना होत नाही. बडीशेप खाल्ल्याने मूड आणि तोंड दोन्ही फ्रेश राहतात आणि आपल्या तोंडातील बॅक्टेरियाही निघून जातात.

कोरडा खोकला येत असल्यास चमचाभर मधात थोडी बडीशेप मिक्स करून दिवसातून दोन ते तीन वेळा चावून खाल्ल्यास कोरडा खोकला कमी होतो.

आपल्याला जेवण केल्यानंतर चिमुटभर बडीशेप खाण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा; अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page