अनुलोम विलोम प्राणायाम करण्याचे आरोग्यदायी फायदे

अनुलोम विलोम प्राणायाम हा एक श्वासोच्छवासाचा व्यायाम आहे जो पारंपारिक योगाशी संबंधित आहे जो मन आणि शरीराला शांत करण्यासाठी वापरला जातो. हा व्यायाम आपण आपल्या बोटांच्या सहाय्याने उजव्या आणि डाव्या नाकपुडीमध्ये आलटून पालटून दीर्घ श्वासोच्छ्वास आणि उच्छवास याद्वारे करू शकतो.

आज आपण अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत. नियमित सकाळी अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने आपण आपल्याला असणारा तणाव कमी करू शकतो. तणाव कमी झाल्याने आपल्या शरीराची एकूण कार्यक्षमता सुधारायला मदत मिळते. आपल्याला आलेले नैराश्य आणि चिंता दूर होतात. आपल्या मेंदूची कार्यपद्धती सुधारते.

सकाळी अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने आपल्याला असणारा डोकेदुखी/मायग्रेन चा त्रास कमी व्हायला मदत मिळते. जे लोक सारखी सारखी चीडचीड करतात त्यांना अन्न पचनाचे आजार एसीडीटी, पोट साफ न होणे, अपचन, गॅस होणे असे होण्याचा धोका असतो.

सकाळी अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने आपण रागावर नियंत्रण मिळवू शकता. राग कमी येईल तर चीड चीड होणार नाही. नियमितपणे सकाळी अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने आपल्याला चांगली झोप यायला मदत मिळते.

शरीरातील अवयव आणि मन स्थिर ठेवण्यासाठी रक्ताभिसरण क्रिया चांगल्या प्रकारे होणे हे महत्वाचे असते. प्राणायाम केल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि संपूर्ण शरीरातील नसा शुद्ध होतात. रक्तशुद्धीकरण झाल्याने नसांमधील ब्लोकेज अडथळे दूर होऊन आपले हृदय निरोगी राहते. नियमितपणे अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने आपल्या त्वचेवर तेज येते.

अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने शरीरात ऑक्सिजनचा सुरळीत प्रवाह चांगल्याप्रकारे होतो. सायनस आणि घोरणे यासारख्या समस्या दूर होतात. नियमितपणे अनुलोम विलोम प्राणायाम केल्याने फुफ्फुसांची क्षमता झपाट्याने सुधारते. फुफ्फुस मजबूत व्हायला मदत मिळते.

आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करण्याचे आरोग्यदायी फायदे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंटमध्ये सांगा;  अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक करा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page