अंकुरीत चणे खाल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे

चणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. चण्यांना अंकुर आल्यावर त्यामधील पोषक घटकांमध्ये वाढ होते. अंकुरलेल्या चण्यांमध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे  असतात. आज आपण अंकुरीत चणे खाल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

अंकुरीत चणे खाल्याने त्यामध्ये असणाऱ्या प्रोटीन, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत व्हायला मदत मिळते. अंकुरलेल्या चण्यांमध्ये फायबर घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी दररोज 1 वाटी अंकुरलेले चणे खाल्ले पाहिजे.

आपल्याला थोडे काम केल्यावर सुस्ती आणि थकवा येत असेल तर आपण सकाळी नाष्ट्यामध्ये अंकुरलेले चणे खा. अंकुरलेल्या चण्यांमध्ये असणाऱ्या पोषक घटकांमुळे आपण दिवसभर ऊर्जावान राहाल. आपण काम करताना उत्साही राहाल.

सकाळी रिकाम्या पोटी अंकुरित चणे खाल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित व्हायला मदत मिळते. शरीरातील अतिरिक्त ग्लुकोज कमी करण्यास देखील मदत करते.

एनिमिया आजारापासून बचाव करण्यासाठी चणे हे एक उत्तम औषध आहे. सकाळी रिकाम्यापोटी गुळासोबत अंकुरलेले चणे खाल्याने आपल्या शरीरातील लोहाची कमतरता दूर होईल.

अंकुरलेल्या चण्यांमध्ये असणाऱ्या फॉस्फरस आणि लोह घटकांमुळे आपल्या शरीरात नवीन रक्त पेशी तयार व्हायला मदत होईल. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी देखील वाढेल. आपल्याला आलेला अशक्तपणा दूर होईल.

आपल्याला वारंवार लघवीला लागत असल्यास, लघवी करताना जळजळ होत असल्यास सकाळी रिकाम्यापोटी अंकुरलेले चणे खाल्याने लघवीच्या आजारात आजारात आराम मिळतो.

रात्रीच्या वेळी मातीच्या भांड्यात भिजवलेले चणे खाणे पुरुषांसाठी खूप फायदेशीर आहे. रिकाम्यापोटी अंकुरलेले चणे खाल्याने पुरुषांच्या शरीरातील कमजोरी दूर होते. यासोबतच दुधाचेही सेवन करता येते आणि भिजवलेल्या चण्याचे पाणी मधात मिसळून प्यायल्याने पुरुषत्व वाढते.

त्वचेचा रंग सुधारण्यासाठी चण्यांचा वापर करता येऊ शकतो. यासाठी भिजवलेले चणे दुधासोबत मिक्सरमध्ये बारीक करून त्यात मध आणि हळद टाकून पेस्ट बनवा हि पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. 30 मिनिटे राहूद्या नंतर चेहरा पाण्याने धुऊन टाका. असे केल्याने त्वचेचा रंग निखळतो आणि त्वचा चमकदार दिसू लागते.

चणा डाळ रात्री भिजवून सकाळी मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये थोडीशी साखर आणि पाणी मिसळून प्यायल्याने मानसिक ताणतणाव कमी व्हायला मदत मिळते. नियमितपणे रिकाम्यापोटी गुळासोबत अंकुरलेले चणे खाल्याने संधीवात किंवा सांधेदुखीचा त्रास होत नाही.

आम्हाला आशा आहे कि अंकुरलेले चणे खाल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे आपण कमेंट करून सांगाल. आम्ही तुमच्या कमेंटची वाट पाहत आहोत.

वरती दिलेल्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचा असल्यास आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page