हिवाळ्यात सकाळी 2-3 अंजीर खाण्याचे फायदे

निरोगी राहण्यासाठी आपण फळे आणि सुका मेवा खायला पाहिजे अस आपण नक्कीच ऐकल असेल. अंजीर हे एक असे फळ आहे जे कच्चे आणि सुकवून दोन्ही प्रकारे आपण खाऊ शकतो. अंजीरला इंग्रजीत फिग असे म्हणतात.

अंजीर दिसायला उंबराच्या फळासारखे असते. अंजीरमध्ये देखील खूप साऱ्या बिया असतात मात्र अंजीर पिकल्यावर चवीला थोड गोडसर लागत. आज आपण सकाळी 2-3 अंजीर खाल्याने कोणकोणते फायदे मिळू शकतात हे जाणून घेणार आहोत.

अंजीरमध्ये एंटिऑक्सिडंट्स, विटामिन ए, विटामिन बी, विटामिन सी, विटामिन के, प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, आयरन, मॅग्नीशियम, जिंक, फॉस्फरस, कॉपर, फायबर असे बरेच पोषक घटक असतात.

सकाळी अंजीर खाल्याने त्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियम आणि मॅग्नीशियम ह्या पोषक घटकांमुळे आपली हाडे मजबूत व्हायला मदत होते. अंजीर खाल्याने आपल्या शरीरातील रक्त शुद्धीकरण व्हायला मदत मिळते.

अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर घटक असल्याने सकाळी अंजीर खाल्याने बद्दकोष्ठता आजार दूर होईल. अंजीराचे सेवन केल्याने मुळव्याधाचा त्रास कमी व्हायला मदत मिळेल.

अंजीर खाल्याने कोलॅजनचे प्रमाण योग्य राखायला मदत मिळते. कोलॅजनचे प्रमाण योग्य राहिल्याने आपली त्वचा चांगली राहते, आपल्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येत नाही.

अंजीरमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या कमी व्हायला मदत मिळेल.

आपल्याला हिवाळ्यात सकाळी 2-3 अंजीर खाण्याचे फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page