अंजीर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. अंजीरामध्ये झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर घटक असतात. अंजीर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी खूप चांगले फळ मानले जाते. कारण अंजीरामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम असे अनेक गुणधर्म आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.
अंजीरामध्ये भरपूर कॅल्शियम असते, ज्यामुळे आपली हाडे मजबूत होतात. अंजीरासोबत दुधाचे सेवन केल्याने हाडांची झालेली झीज भरून यायला मदत मिळते. नियमित अंजीर सेवन केल्याने महिलांच्या शरीरातील हार्मोन संतुलित व्हायला मदत होऊन अनियमित मासिक पाळीची समस्या दूर होऊ शकते.
अंजीरामध्ये पोटॅशियम हे महत्त्वाचे खनिज असते. अंजिराचे नियमित सेवन केल्याने रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होते. सकाळी अंजीराचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
अंजीरामध्ये पेक्टिन नावाचे विरघळणारे फायबर घटक असतात, जे रक्तातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त असतात.
शरीरात लोहाची कमतरता असल्यास एनिमिया आजार होण्याची शक्यता असते. नियमित अंजीराचे सेवन केल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते.
बद्धकोष्ठता, मूळव्याध, गॅस, एसिडिटी यासारख्या समस्या असल्यास अंजीर रात्री पाण्यात भिजवा आणि सकाळी रिकाम्या पोटी खा असे केल्याने बद्धकोष्ठता, मूळव्याध, गॅस, एसिडिटी यासारख्या समस्या दूर होतात.
आपल्याला अंजीराचे सेवन केल्याने मिळणारे आश्चर्यकारक फायदे हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा; अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.
ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.