अनियमित पाळीमुळे त्रस्त आहात? फॉलो करा ‘हे’ घरगुती उपाय

प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते. अशा परिस्थितीत अनेक वेळा स्त्रिया त्यांच्या मासिक पाळीबद्दल खूप अस्वस्थ होतात कारण वेळ निघून गेल्यावरही काही महिलांना मासिक पाळी येत नाही. किंवा काही महीलांना नियमित पाळी येत नाही.

आजकालच्या तणावपूर्ण जीवनशैलीमुळे बहुतेक महिला अनियमित मासिक पाळीमुळे त्रस्त असतात. साधारणपणे पाळीचा कालावधी चक्र 28 दिवसांचे असते, जे दर महिन्याला इतक्या दिवसांच्या फरकाने चालू राहते.

मासिक पाळी न येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे गर्भधारणा, परंतु जर तुम्ही ग’र्भधारणेची योजना आखत नसाल आणि तरीही तुमची मा’सिक पा’ळी चुकत असेल किंवा जास्त पुढे जात असेल तर याची अनेक कारणे असू शकतात.

अशा परिस्थितीत, अस्वस्थ होण्याऐवजी किंवा कोणतेही बाह्य औषध घेण्याऐवजी, काही घरगुती उपाय करून तुम्ही तुमची मासिक पाळी सहज वेळेवर आणू शकता. पाहूयात काही घरगुती उपाय.

मासिक पाळी नियमित येण्यासाठी रोज तुळशीच्या पानांचा एक चमचा रस दिवसातून दोन वेळा प्या. असे केल्याने आपल्या शरीरातील हार्मोन संतुलन होऊन मासिक पाळी नियमित येते.

हळद ही एक उबदार औषधी वनस्पती देखील मानली जाते. हे मासिक पाळी आणि संबंधित हार्मोन्सचे नियमन करण्यास मदत करते. महिलांनी रोज रात्री एक ग्लास दुधात हे मिश्रण प्यायल्यास खूप फायदा होतो.

महिलांची थांबलेली मासिक पाळी आणण्यासाठी कोथिंबीर खूप उपयुक्त आहे. एक चमचा कोथिंबीर दोन कप पाण्यात उकळा. पाणी एक वाटी राहिल्यावर गॅस बंद करून चांगले गाळून घ्या.

हे पाणी दिवसातून तीन वेळा प्या. समान नियमाने याचे सेवन करत राहिल्यास मासिक पाळी येण्यास खूप परिणामकारक ठरेल. अनेक स्त्रिया मासिक पाळी नियमित करण्यासाठी हा उपाय वापरतात.

विविध समस्यांवर योगासने हा नेहमीच प्रभावी उपचार म्हणून ओळखला जातो.एका अभ्यासात असे आढळून आले की नियमित योगा केल्याने अनियमित पाळी नियमित येण्यास मदत होते. योगासने मासिक पाळीशी संबंधित वेदना आणि भावनिक लक्षणे, जसे की नैराश्य आणि चिंता कमी करण्यासाठी देखील फायदेशीर समजले जाते.

जेव्हा मासिक पाळी येत नसेल किंवा नियमित नसेल तर आल्याचे सेवन सुरू करा. आले अनियमित मासिक पाळी वेळेवर आणते. एक चमचा आले एक कप पाण्यात टाकून थोडावेळ उकळा, त्यात थोडी साखर घाला आणि हे मिश्रण दिवसातून थोडेसे तीन वेळा घ्या.

जर तुम्हाला हे मिश्रण घेण्यास काही त्रास होत असेल तर सकाळी गुळासोबत आले खाणे देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. याने तुमची पाळी येण्यास मदत होईल. हि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. आम्ही आपल्या कमेंटची वाट बघत आहोत.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page