अंगावर खाज येणे त्वचाविकार घरगुती उपाय

दररोज आंघोळ न करण्यामुळे, घाणेरडे कपडे घातल्याने, कधी कधी एखाद्या गोष्टीची अलर्जी झाल्याने, किडे चावल्याने, एखादा साबण किंवा प्रसाधन वापरल्याने किंवा त्वचेचा एखादा विकार उद्भविल्याने त्वचेला खाज सुटू शकते.

आज आपण जाणून घेऊयात अंगावर खाज येत असल्यास कोणते घरगुती उपाय करू शकतो. सर्वप्रथम दिवसातून 2-3 वेळा हलक्या कोमट पाण्याने खाज येत असलेली जागा धुउन घ्या म्हणजे ती जागा स्वच्छ होईल आणि जंतू मरतील.

ज्या ठिकाणी खाज येत आहे त्या जागेवर तुळशीची पाने चोळल्याने खाज कमी होण्यास मदत मिळेल. आपण तुळशीच्या पानांचा रस हि खाज येत असलेल्या जागेवर लावू शकता.

त्वचेवरील ओलावा कमी कमी झाल्याने त्वचेवर खाज सुरु होते. अश्या वेळी खाज येत असलेल्या जागेवर कोरफडाचा गर लावल्याने खाज कमी होण्यास मदत मिळेल. कोरफडामध्ये मॉइस्चरायझिंग गुणधर्म असतात.

हे आपल्या त्वचेला ओलावा प्रदान करतात आणि कोरफडाचा गर लावल्याने लावल्याने आपल्या त्वचेची जळजळ कमी होऊन खाज येणे बंद होईल. ज्या ठिकाणी खाज येत आहे त्या जागेवर आपण पुदीनाची पानांचा रस लावू शकता.

खाज कमी होण्यासाठी लिंबू कापून त्याचा रस खाज येत असलेल्या जागेवर लावल्यास आराम मिळेल. आणि खाज येण्याने होणाऱ्या वेदनांपासून आपली मुक्तता होईल. खाज येत असलेल्या जागेवर पेट्रोलियम जेली लावू शकता. पेट्रोलियम जेली लावल्यामुळे शरीरावर येत असलेली खाज कमी होते.

ज्या ठिकाणी खाज येत आहे त्या जागेवर नारळाच्या तेलाने मालिश करा असे केल्याने लवकर आराम मिळेल. आपण जर नियमित त्वचेवरील खाज येण्याच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर रोजच्या जेवणामध्ये जास्तीत जास्त फळं आणि भाज्यांचा समावेश करून घ्या.

याबरोबरच खाज येत असल्यास, साबण, परफ्यूम अशा गोष्टींपासून दूर राहणंच योग्य आहे. आपल्याला अंगावर खाज येणे त्वचाविकार घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page