वाढत्या उष्णतेमुळे आणि घामामुळे अंगाला खाज यायला लागते. अंगाला खाज येत असेल तर त्यामुळे चिडचिड व्हायला लागते म्हणूनच आज आपण अंगाला खाज येत असेल तर कोणकोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात हे जाणून घेणार आहोत.
अंगाला खाज येत असल्यास कडुलिंबाची थोडीशी पाने दगडावर वाटून त्याचा लेप खाज येत असलेल्या ठिकाणी लावा. असे केल्याने खाज येणे बंद होईल. तसेच अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने टाकून त्या पाण्याने आंघोळ करा. खाज येत असलेल्या ठिकाणी कोरफड गर अथवा कोरफड जेल लावल्याने देखील खाज येणे थांबून आराम मिळतो.
खाज येत असलेल्या भागावर तुळशीच्या पानांचा लेप लावल्याने आराम मिळू शकतो. नारळाचे तेल लावल्याने लवकर आराम मिळू शकतो. खाज येत असलेल्या ठिकाणी हळदीची पेस्ट लावल्यास खाज येणे थांबते.
खाज येत असलेल्या भागावर बेकिंग सोड्याची पेस्ट लावा. 10 मिनिटे राहूद्या नंतर थंड पाण्याने धुऊन टाका. खाज येणे थांबून आराम मिळेल. मुलतानी मातीचा लेप लावल्याने देखील खाज थांबायला मदत मिळते.
आपल्याला अंगाला खाज येणे घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. अशीच चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक/ फॉलो करा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.