अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय

अंडरआर्मची त्वचा मऊ आणि नाजूक असते. हेअर रिमूव्हल क्रीमचा अति वापर, घट्ट कपडे वापरणे, वेगवेगळ्या प्रकारच्या डिओड्रंटचा वापर केल्यामुळे ही अंडर आर्म काळे पडतात. 

अंडरआर्मच्या त्वचेचा रंग उजळवण्यासाठी केमिकलचा वापर करून बनवलेल्या प्रसाधानाचा वापर केल्याने आपल्या त्वचेला नुकसान पोहचू शकते. म्हणूनच आज आपण अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

अंडरआर्मचा काळेपणा घालवण्यासाठी कोरफडीचा गर अंडरआर्मवर लावा. अर्धा तास तसेच राहूद्या. त्यानंतर अंडरआर्म कोमट पाण्याने धुऊन घ्या. असे केल्याने आपले अंडरआर्म स्वच्छ आणि डाग रहित होतील.

अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी एक पिकलेल्या पपईचा तुकडा किसून त्याची पेस्ट तयार करून अंडरआर्मवर हाताने घासा असे केल्याने अंडरआर्मचा काळेपणा दूर होण्यास मदत मिळेल.

अंडरआर्म्समधील काळेपणा दूर करण्यासाठी बटाटे मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा रस गाळणीने गाळून घ्या. हा रस अंडरआर्म्सवर लावून साधारण 15 मिनिट्स तसाच राहूद्या. असे नियमित केल्याने काही दिवसातच तुमचे अंडरआर्म्स स्वच्छ दिसू लागतील.

अंडरआर्म्समधील काळेपणा दूर करण्यासाठी थोडासा बेकिंग सोडा घेऊन त्यात दोन थेंब लिंबाचा रस घाला आणि ती पेस्ट अंडरआर्म्सला दोन मिनिटे लावून ठेवा त्यानंतर अंडरआर्म्स कोमट पाण्याने धुवून टाका. असे केल्याने काही दिवसातच तुमचे अंडरआर्म्स स्वच्छ दिसू लागतील.

आपल्याला अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा.

Leave a Comment

You cannot copy content of this page