डाळिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असणारे फळ आहे. रोज एक डाळिंब खाल्ल्याने रक्त वाढायला मदत मिळते. डाळींबाचे सेवन केल्याने हृदय चांगल्या प्रकारे कार्य करते. रोज एक डाळिंबाचे सेवन केले तर हृदयविकाराचा धोका खूप कमी होतो.
आपण डाळिंबाचा रस, डाळिंबाचे दाणे कोणत्याही प्रकारे सेवन करू शकता. डाळिंब जेवढे खायला चविष्ट आहे तेवढेच आपल्या शरीराला त्याचे सेवन केल्याने मिळणारे फायदे हि आहेत. डाळिंबात एन्टी ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन डी, पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम, लोह असे पोषक घटक आढळतात.
अशक्तपणा आल्यास आणि कावीळ आजाराच्या उपचारांसाठी 250 मिली डाळिंबाच्या रसात 50 ग्रॅम साखर मिसळून सरबत तयार करा. दिवसातून 3-4 वेळा हे सरबत सेवन करा. असे केल्याने अशक्तपणा आणि कावीळ पासून आपल्याला आराम मिळेल.
डाळिंबाच्या रसाचे नियमित सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. डाळिंब खाल्ल्याने आतड्यांमध्ये होणारी जळजळ कमी होते आणि आपली पचनक्रिया सुधारते. डाळिंबाचा रस प्यायल्याने पुरुषांमधील शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते. भूक लागत नसेल तर डाळिंबाच्या रसात थोडेसे मीठ आणि मध मिसळून प्यायल्याने भूक वाढते.
पोट साफ होत नसल्यास डाळींबाचे दाणे नीट चावून खाल्ल्याने पोट साफ व्हायला मदत होते तसेच आपली पचनशक्ती मजबूत होते. नियमित डाळींब खाल्याने त्वचेवरील डाग कमी होऊ लागतात. त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.
जुलाब थांबवण्यासाठी डाळिंबाच्या सालीची 2-3 ग्रॅम चूर्ण बनवा. सकाळी आणि संध्याकाळी ताज्या पाण्यासोबत प्या. असे केल्याने जुलाब थांबतील आणि आपल्याला आराम वाटेल.
थोडे काम केले तरी लगेच थकवा येत असल्यास 20 ग्रॅम डाळिंबाची ताजी पाने घेऊन 300 मिली पाण्यात टाकून उकळून घ्या. पाणी अर्धे राहिल्यानंतर त्यामध्ये कोमट दूध मिसळून प्या. यामुळे शारीरिक दुर्बलता दूर होते. आपल्याला डाळिंब खाण्याचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.