ananas khanyache fayde

अननस खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

Mahtvache

आपले आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आपण वेगवेगळी फळे खाल्ली पाहिजे हे आपल्याला माहित असेलच. आज आपण अश्याच चवदार फळा विषयी जाणून घेऊयात.

दिसायला बाहेरून खडबडीत आणि आतून रसरशीत असलेल्या अननस या फळा बद्दल आपण आज जाणून घेऊयात. अननस मध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सीमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

अननस मधील ब्रोमोलिन हा घटक हाडांना निरोगी ठेवतो. अननस आपल्या हाडांसाठी खुप चांगले असते. कारण यामध्ये मॅग्नेशियम असते. मॅग्नेशियम एक असे पोषकतत्व आहे जे हाडांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. आपण वाढत्या वयातील मुलांना त्यांची हाडे मजबूत होण्यासाठी अननस खायला देऊ शकता.

अननस हे फळ आपली पचनसंस्था सुधारण्यास मदत करते ह्यात व्हिटॅमिन सी आणि फायबर असल्यामुळे आपली पचनशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.

अननसमध्ये असलेली काही पोषकद्रव्ये जी फारच कमी फळांमध्ये आढळून येतात. त्यापैकी एक बीटा-कॅरोटीन नावाचा घटक आहे, जो दम्याच्या रूग्णांसाठी खूप उपयुक्त आहे. जो अननसमध्ये आढळून येतो.

मुतखड्याचा त्रास असल्यास डॉक्टर अननसचा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात. मुतखड्याचा त्रास असल्यास अननसचा ज्यूस पिताना एक काळजी अवश्य घ्या ज्यूसमध्ये साखर टाकू नका.

अननस खाल्याने अननसमध्ये असलेला ब्रोमोलेन हा घटक धमन्यामधील रक्त जमा होण्यापासून आणि सूज येण्यापासुन थांबवतो. ज्यामुळे हृदयाच्या आजारांची भिती कमी होते.

आपल्याला अननस खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *