पुण्यात अनेक ऐतिहासिक वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. पुण्याच्या आसपासचा परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. तसेच पुण्याच्या शहरांमध्ये आपल्याला अनेक वाडे, जुनी मंदिरे, अशा ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात.
परंतु गजबजलेल्या शहरांमध्ये अनेक सुंदर वास्तु गर्दीमध्ये दडलय गेलेल्या आहेत. पुणे शहरासोबतच पुणे जिल्ह्याच्या थोड्या आडवाटेला अनेक प्राचीन मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात.
परंतु माहिती अभावी ही अजूनही अपरिचितच आहेत. यातीलच गुंजवणे मावळातील एक अपरिचित ऐतिहासिक मंदिर म्हणजे ”अमृतेश्वर” मंदिर होय.
पुण्याहुन 45 किलोमीटरच्या अंतरावर गुंजवणे मावळात हे अमृतेश्वर मंदिर आहे. हे मंदिर आज अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत आहे. या मंदिराचे बांधकाम दगडांमध्ये करण्यात आलेले असून यावर वाघ, सिंह, हत्ती, बैल, गाय या प्राण्यांची शिल्पे तसेच पुष्प, कमळ अशी शिल्पे कोरण्यात आलेले आहेत.
या मंदिरावरील प्रसिद्ध शिल्प म्हणजे ”गंडभेरुंड” शिल्प होय. अमृतेश्वर मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये शिव लिंगाची स्थापना करण्यात आलेली आहे.
या मंदिराचा सभामंडप नव्याने बांधण्यात आलेला आहे. दारामध्ये सुंदर दीपमाळ असून त्रिपुरारी पौर्णिमेच्या उत्सवाच्या वेळेस या दीपमाळेचा प्रकाश संपूर्ण परिसरामध्ये पडतो आणि संपूर्ण परिसर लक्ख उजळून निघतो.
येथे महाशिवरात्रीला मोठा उत्सव साजरा केला जातो. तीन दिवस भजन-कीर्तनाचे कार्यक्रम केले जातात. गुंजवणी नदी या परिसरात असल्यामुळे या मंदिराच्या भागत अत्यंत गारवा प्राप्त झाल्याने हे ठिकाण पर्यटनासाठी अत्यंत सुंदर आहे. हे मंदिर पुरातन असल्याने येथे तुम्हाला अनेक शिल्पे पाहायला मिळतात.
पुण्याहून निघाल्यानंतर पुणे-सातारा या मुख्य हायवेवर पुरंदर किल्ल्या कडे जाणाऱ्या रस्त्यावरून भोर फाट्याला आत वळावे. तेथून गुंजवणी नदीवरील छोटा पूल पार करून गेल्यानंतर मोहरी या गावामध्ये हे मंदिर पाहायला मिळते. या मंदिराचा अपरिचित ठेवा जपण्याचे काम केले पाहिजे. हे मंदिर म्हणजे शिल्पाकृतींचा अप्रतिम नमुना आहे.
आपल्याला पुण्यातील अपरिचित अमृतेश्वर मंदिराची माहिती ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.
अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा. महत्वाची टीप: हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.