अमरावती जिल्ह्यातील गाविलगड किल्याचा इतिहास आणि माहिती

अमरावती जिल्ह्यातील गाविलगड किल्याला विदर्भाचे भूषण म्हटले तरी चालेल. साधारणपणे बाराव्या शतकात गवळ्यांनी ह्या किल्याची बांधणी केली मात्र नंतर बलाढ्य अशा गोंडानी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

किल्ल्याच्या भोवती घनदाट जंगल असल्या कारणाने सध्या हा किल्ला चिखलदरा तालुक्याच्या जवळ असणाऱ्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समावून घेण्यात आलेला आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो.

ह्या किल्याच्या इतिहासाविषयी एक जुनी दंतकथा सांगितली जाते. महाभारतातील भीमाने कीचकासोबत कुस्ती करून त्याचा वध ह्या ठिकाणी केला आणि त्याचे प्रेत बाजूच्या दरीत फेकले. कीचकाची दरी म्हणजे कीचकदरा. चिखलदरा हा शब्द कीचकदरा या शब्दाचे मराठी रूपांतर म्हणता येईल.

त्यानंतर अगदी अलीकडच्या काळात इ.स. १८०३ मध्ये दुसऱ्या मराठा-इंग्रज युद्धाच्या वेळी  या किल्यावर एक महत्त्वाची लढाई झाली होती. फील्ड मार्शल आर्थर वेलेस्लीच्या इंग्रजी सैन्याने या ठिकाणी मराठ्यांचा पराभव केला होता.

आपण ह्या किल्याला भेट द्यायचा विचार करत असाल तर किल्ल्यावरील दरवाजावर असणारी शार्दुलाची प्रेक्षणीय शिल्पे, चौथा दरवाजा, दिल्ली दरवाजा, राणीमहाल, दरबार, किल्यावरील तलाव, निजामकालीन कोरीव मूर्ती, किल्यावर असणाऱ्या दहाच्या आसपास तोफा आपण बघू शकता.

ह्या तोफांवर देवनागरी, उर्दू, अरबी भाषांमधील मजकूर कोरण्यात आलेला आहे. हा किल्ला बघताना आपल्याला तत्कालीन वैभवाचा अंदाज येईल.

हा किल्ला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेला आहे. ऑक्टोबर ते जून ह्या काळात येथील हवामान खूपच छान असते. आपल्याला अमरावती जिल्ह्यातील गाविलगड किल्याची हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.

माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page