आल्याचे औषधी गुणधर्म आणि आरोग्यदायी फायदे

आल्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. आपल्यापैकी फार कमी लोकांना माहित असेल की त्यात चमत्कारिक औषधी गुणधर्म ही असतात. आल्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, जीवनसत्त्वे, नैसर्गिक प्रतिजैविक आणि बरेच उपयुक्त घटक असतात ज्याचे आपल्या शरीराला खुप फायदे होतात.

आले चहामध्ये मिसळल्यास चहाची चव अप्रतिम होते. सकाळी आल्याचा चहा प्यायल्याने शरीराला ऊर्जा मिळते. मा’सिक पा’ळीच्या दिवसात कंबर आणि पोट दुखत असल्यास अर्धा चमचा आल्याचा रस मधात मिसळून प्यायल्याने होणारा त्रास बऱ्यापैकी कमी होतो.

डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास कमी होण्यासाठी आपण सकाळी कोऱ्या चहामध्ये आले मिसळून प्या. कोऱ्या चहामध्ये आले मिसळून प्यायल्याने वेदना कमी होऊन आराम मिळतो. सांधेदुखीचा त्रास होत असल्यास अर्धा चमचा सुंठ पावडर आणि मध मिसळून चाटल्याने वेदना कमी होऊन आराम मिळतो.

पोटदुखी आणि गॅसच्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी सकाळी 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा आल्याचा रस मिसळून पाणी प्यायल्याने आराम मिळू शकतो.

आल्याचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल कमी होते, रक्तदाब नियंत्रित होतो आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून बचाव होतो, त्यामुळे हृदयविकारापासून आपले रक्षण होऊ शकते.

सकाळी कोमट पाण्यासोबत आल्याचा रस मिसळून प्यायल्याने वजन कमी व्हायला मदत होते. आपल्याला आल्याचे औषधी गुणधर्म आणि आरोग्यदायी फायदे ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण अवश्य सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page