आपल्या घरातील स्वंयपाकाची बहुतेक भांडी अल्युमिनियमची बनलेली असतात. जगातील सुमारे 60 टक्के भांडी अल्युमिनियमपासून बनविली जातात. याचे सर्वात मोठे कारण अल्युमिनियम हा धातू इतर धातूंपेक्षा स्वस्त आणि टिकाऊ आणि उष्णतेचे चांगला वाहक असल्याने स्वंयपाकघरात अल्युमिनियमच्या भांड्याचा वापर सर्रास केला जातो. आज आपण अल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केल्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम जाणून घेणार आहोत.
अल्युमिनियमची भांडी स्वस्त असतात. परंतु आपल्या आरोग्यावर त्याचे बरेच दुष्परिणाम होत असतात. अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये शिजवलेल्या अन्नाचे सेवन केल्यास आपल्या शरीरात दररोज साधारणपणे 2 ते 4 मिलीग्राम अल्युमिनियम जात असत. आपले शरीर इतके अल्युमिनियम बाहेर काढू शकत नाही. कालांतराने या अल्युमिनियममुळे आपल्याला गंभीर आजारांना सामोरे जाव लागू शकत.
जर आपण बारकाईने बघितले तर आपल्या लक्षात येईल. अल्युमिनियमच्या भांड्यात बनवलेल्या अन्नाचा रंग काही प्रमाणात बदलतो. अल्युमिनियमच्या भांड्यात शिजवलेल्या खाद्यपदार्थांची चव वेगळी असण्याचे कारण हि खूप रंजक आहे.
वेगवेगळ्या भाज्यांमधून आपल्याला वेगवेगळी जीवनसत्व आणि खनिजे मिळत असतात. परंतु अॅल्युमिनियमच्या भांड्यात अन्न शिजवल्यामुळे अल्युमिनियम अन्नामधील लोह आणि कॅल्शियम सहजतेने शोषून घेते, ज्यामुळे आपली हाडे कमजोर होऊ लागतात. अल्युमिनियम भांड्यांमध्ये तयार केलेले अन्न खाण्याचा दुष्पपरिणाम लहान मुलांमध्ये लवकर दिसून येतो.
जर आपण अल्युमिनियमच्या भांड्यात भाजी बनवली तर भाज्यांमध्ये असणाऱ्या घटकांशी अॅल्युमिनियमची रासायनिक प्रक्रिया होऊन भाजीची चव बिघडते त्यातील पोषक तत्व नष्ट होतात. अशी भाजी खाल्याने बऱ्याचदा पोट दुखते. जुलाब सुरु होतात.
बरीच वर्ष अल्युमिनियमच्या भांड्यात बनवलेले अन्न खाल्यास अॅल्युमिनियम आपल्या स्नायू, मूत्रपिंड, यकृत आणि हाडांमध्ये जमा होते ज्यामुळे बरेच गंभीर आजार होऊ शकतात. म्हणून, अन्न नेहमी लोखंडाच्या, स्टेनलेस स्टील किंवा मातीच्या भांड्यात शिजवले पाहिजे. आपल्या अन्नाची चव आणि आरोग्यासाठी हे चांगले आहे.
आपल्याला अल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केल्यामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम. हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.
या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.