एल्युमिनियम च्या भांड्यामध्ये हे पदार्थ शिजवू नका होतील गंभीर परिणाम

स्वस्त आणि टिकाऊ असल्यामुळे जवळपास प्रत्येक घरात काही अल्युमिनियम च्या भांड्यांचा वापर केला जातो. अल्युमिनिअमची भांडी ही उष्णतेचे उत्तम वाहक असतात. त्यामुळे अल्युमिनियम च्या भांड्यामध्ये अन्न लवकर शिजते. मात्र अल्युमिनियम हा एक प्रकारचा थायरोटॉक्सिक धातू असतो जो आपण अल्युमिनियम च्या भांड्यात शिजवलेल्या अन्नात सहज विरघळतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अल्युमिनियम च्या भांड्यामध्ये कोणकोणते पदार्थ शिजवू नये.

अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये आम्लयुक्त पदार्थ शिजवल्यावर त्या पदार्थासोबत रासायनिक प्रक्रिया होऊन धातूचे कण अन्नात मिसळतात. त्यामुळे आपल्या शरीरात अल्युमिनियम घटक जाऊ शकतात.

अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये टोमॅटोची भाजी कधी हि शिजवू नका टोमॅटो आम्लयुक्त असते अल्युमिनियमच्या भांड्यात टोमॅटोची भाजी शिजवल्यावर त्याच्या चवीवर परिणाम होतो. तसेच, टोमॅटो अम्लीय असल्याने टोमॅटो मधील आम्लीय घटकांची अल्युमिनियम सोबत रासायनिक प्रक्रिया होऊन अल्युमिनियम धातूचे कण अन्नात मिसळले जाऊ शकतात.

अल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये व्हिनेगर घातलेले पदार्थ कधी हि ठेऊ नका, अॅल्युमिनियमची  व्हिनेगर सोबत रासायनिक प्रक्रिया होते. असे अन्न खाल्याने आपल्या पोटात दुखू शकते, जुलाब होऊ शकतात, उलट्या होऊ शकतात.

अल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये लोणचे कधी हि ठेऊ नका. लोणचे लवकर खराब होते तसेच लोणच्याची चव बिघडते, लोणच्याचा रंग बदलतो. असे लोणचे खाल्याने आपल्याला वेगवेगळे आजार होऊ शकतात.

अल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये  दही कधी बनवायला ठेऊ नका, दह्यामध्ये लॅक्टीक एसिड असते. अल्युमिनियमची  दह्या सोबत रासायनिक प्रक्रिया होऊन दही खराब होते. असे दही खाल्याने आपल्याला पोटाचे आजार होऊ शकतात.

अल्युमिनियम हा एक जड धातू असतो. अन्नासोबत प्रक्रिया होऊन हळहळू आपल्या शरीरात जाऊन आपल्याला वेगवेगळे आजार देऊ शकतो. अल्युमिनियमच्या भांड्यात दीर्घकाळ शिजवलेले अन्न खाल्याने आपली रोग प्रतिकार शक्ती कमी होऊ शकते.

आपल्याला अल्युमिनियमच्या भांड्यात कोणकोणते अन्न पदार्थ शिजवू नये हि माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page