अळूच्या पानांचे 6 आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश केला जातो. आज आपण अश्याच एका पालेभाजी बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. ह्या पालेभाजीचे नाव आहे अळू; पूर्वी घराच्या परसबागेत अळू लावली जायची.

अळूच्या कंदाची आणि पानांची भाजी केली जाते तसेच अळूच्या पानांच्या रुचकर वड्या देखील बनवल्या जातात. अळूची पानांचा आहारात समावेश केल्याने कोणकोणते आरोग्यदायी फायदे मिळतात हे आपण आता जाणून घेऊयात.

अळूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि पोटॅशियम, लोह, एन्टी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. अळूच्या पानांमध्ये भरपूर फायबर असते. अळूच्या पानांचा आहारात समावेश केल्याने पचनसंस्था निरोगी राहायला मदत मिळते.

अळूच्या पानांमध्ये अमीनो एसिड आणि थ्रोनिन भरपूर प्रमाणात असते. हे दोन्ही घटक कोलेजन आणि इलास्टिन तयार करण्यास मदत करतात. अळूच्या पानांचा आहारात समावेश केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.

अळूच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए असते जे आपल्या डोळ्यांसाठी चांगले असते. अळूच्या पानांचा आहारात समावेश केल्याने आपली नजर तीक्ष्ण होते.

अळूच्या पानांमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण खूपच कमी असते. अळूच्या पानांचे सेवन केल्याने हृदयविकारांचा धोका कमी होतो. अळूच्या पानांमध्ये असलेले फायबर घटक रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल आणि चरबी जमा होण्यास प्रतिबंध करतात.

अळूच्या पानांचा आहारात समावेश केल्याने त्यामध्ये असणाऱ्या एन्टी-ऑक्सिडंट्स घटकांमुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. अळूच्या पानांचा आहारात समावेश केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहायला मदत मिळते.

अळूच्या पानांचे सेवन उकडून करणे आपल्या आरोग्यासाठी हितकारक आहे; कधी ही कच्ची अळूची पाने खाऊ नका. तसे केल्याने घसा दुखू शकतो.

आपल्याला अळूच्या पानांचे 6 आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आपल्या कमेंट्स आम्ही वाचत असतो. त्यामुळे आपले काही प्रश्न असतील तर ते कमेंट्स मध्ये लिहू शकता.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page