अक्रोड खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे

मेंदू सारखा आकार असणाऱ्या अक्रोडामध्ये भरपूर पौष्टिक गुणधर्म असतात. आज आपण ह्या आरोग्यविषयक लेखामधून अक्रोड खाल्याने आपल्याला कोणकोणते फायदे मिळू शकतात हे जाणून घेणार आहोत.

आम्ही नियमित अशीच आपल्या आरोग्यासाठी महत्वाची माहिती पोस्ट करत असतो. हि माहिती वाचायला मिळण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक/ फॉलो करू शकता.

अक्रोड ह्या फळाला हिंदीमध्ये अखरोट आणि इंग्रजीमध्ये वालनट असे म्हणतात. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, प्रोटीन, आयरन, कॅल्शियम, फॉस्फरस, ओमेगा-3 फॅटी ऍसिड, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक असे पोषक घटक असतात.

जर आपण 1 ते 2 अक्रोड नियमितपणे खाल्ले तर आपल्याला रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहील. नियमीत अक्रोड खाल्याने आपली हाडे मजबूत व्हायला मदत होईल.

अक्रोडमध्ये भरपूर फायबर घटक असतात; म्हणून अक्रोड खाल्याने आपली पचनसंस्था चांगली होऊ शकते. अक्रोडाचे नियमित सेवन केल्याने मेंदूचे कार्य सुधारते.

अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई हा पोषक घटक असल्याने नियमीत अक्रोड खाल्याने त्वचेवर आलेला कोरडेपणा आणि सुरकुत्या कमी व्हायला मदत मिळते.

रिकाम्या पोटी अक्रोड भिजवून खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. नियमितपणे अक्रोड सेवन केल्याने डोळ्यांखाली असणारी काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते.

गरोदर स्त्रीयांनी गर्भाची योग्यप्रकारे वाढ होण्यासाठी अक्रोडचे सेवन केल पाहिजे कारण अक्रोडमध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असते; आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समुळे गर्भाच्या निरोगी वाढीस मदत मिळते.

अक्रोड खाल्याने शुक्राणूंची गुणवत्ता सुधारण्यास मदत मिळते. आपल्याला अक्रोड खाण्याचे 10 आरोग्यदायी फायदे हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा.

या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page