अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिराबद्दल थोडक्यात माहिती

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी म्हणजे अक्कलकोट. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर सोलापूर शहरापासून अवघ्या 38 किलोमीटर अंतरावर आहे.

श्री स्वामी समर्थ म्हणजे दत्तात्रेयांचे अवतार होते. श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती यांच्यानंतर दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार म्हणजे स्वामी समर्थ आहेत, असे म्हटले जाते.

अक्कलकोटच्या मुख्य मंदिरामध्ये श्रींच्या पादुका, शिवलिंग, स्वामींच्या स्मृती वस्तू, प्रवचन हॉल अशी व्यवस्था आहे. मुख्य मंदिरामध्ये श्री स्वामी महाराजांची शांत मूर्ती पाहिल्यानंतर मन भक्तीभावाने प्रसन्न होऊन जाते.

आज ज्या ठिकाणी समर्थांचे मंदिर आहे, ते एका झाडाभोवती बांधले गेले आहे. त्या झाडाखाली स्वामी समर्थांनी धारणा केली आणि भक्तांना उपदेश दिला, असे म्हटले जाते.

मंदिर समितीतर्फे भक्तांसाठी अन्नछत्र उघडण्यात आले आहे. येथे मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक भक्त तेथे येऊन अन्नदान करतात. दुपारी आणि रात्री जेवणाचे मोफत व्यवस्था असते.

दत्तसंप्रदायाची परंपरा अखंडित चालू राहावी यासाठी श्री स्वामी समर्थांनी आपल्या अनेक शिष्यांच्या मदतीने मठाची स्थापना केली. त्यानंतर समर्थ शिष्यांनी अनेक मठांची उभारणी केली. अक्कलकोट या तीर्थक्षेत्रात आज समर्थ भक्तांची गर्दी पाहायला मिळते.

आपल्याला अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिराबद्दलची ही माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा. महत्वाची टीप: हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page