आग्रा किल्ल्याचा आश्चर्यकारक इतिहास

मुघलांनी आग्र्यामध्ये यमुना नदीच्या काठावर लाल किल्ला बनवला. १५५८ मध्ये अकबराने लाल वाळूच्या दगडाने या किल्ल्याचे नुतनीकरण केले. हा किल्ला बनवण्यासाठी दररोज सुमारे चार हजार मजूर या किल्ल्यावर बांधकाम करत होते. किल्ला पूर्ण व्हायला आठ वर्ष लागले.

किल्ल्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आपल्याला पहायला मिळते. किल्ल्याभोवती २१ मीटर उंच तटबंदी आहे. त्याच्या भोवती चार दरवाजे असून सध्या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी एकाच प्रवेश द्वाराचा वापर केला जातो. या दरवाज्याला अमर सिंह दरवाजा म्हणून ओळखले जाते.

किल्ल्यामध्ये बादशाहचा राजवाडा आहे. त्याला खास महाल म्हटले जाते. त्यावर आकर्षक फुलांचे भरीव नक्षीकाम केलेलं आहे. त्याचबरोबर किल्यामध्ये शीश महल हि आरश्यानी सजवलेला एक महाल हि आहे.

लाल किल्ला हा सुमारे ९४ एकर क्षेत्रात पसरलेला आहे. त्याकाळी मुघलांचा सर्वात महत्वाचा आणि मजबूत किल्ला म्हणून लाल किल्ला ओळखला जायचा. याच किल्ल्यामध्ये १६६६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची भेट झाली होती.

या किल्ल्यावर मुघलांनी फार काळ राज्य केले. बाबर त्याच्यानंतर त्याचा मुलगा हुमायू नंतर अकबर औरंगजेब यांनी या किल्ल्यावर राज्य केले. मराठ्यांच्या हि ताब्यात हा किल्ला काही काळ होता. अनेक आक्रमणांना तोंड देऊन देखील आजही हा किल्ला सुस्थित आहे. लाल किल्ला हा ताजमहाल पासून फक्त 3 किलोमीटर अंतरावर आहे.

आपल्याला ही ऐतिहासिक माहिती कशी वाटली हे कमेन्ट करून आम्हाला नक्की सांगा. अजुन कोणत्या विषयावरील माहिती आपल्या वाचायला आवडेल हे पण नक्की सांगा. अशीच वेगवेगळ्या विषयावरील माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करा. आमच्या पोस्ट सगळ्यात आधी पाहण्यासाठी पोस्ट नोटीफीकेशन सुरू करा. हा लेख वाचल्या बद्दल धन्यवाद‌‌‍‍.

Leave a Comment

You cannot copy content of this page