अफझलखान वधाच्या कवितेमुळे टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवला होता

एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून भारतीय लोक आधुनिक नागरी स्वातंत्र्यकडे खास करून वृत्तपत्र स्वातंत्र्यकडे आकर्षित झाले होते. वृत्तपत्रांद्वारे होणारा भारतीयांचा विरोध पाहता इ. स. १८७८ च्या व्हर्नक्युलर प्रेस ऍक्ट नुसार, जी वृत्तपत्रे सरकारच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून राजद्रोहाला उत्तेजन देणारा मजकूर छापतील त्याच्यावर राजद्रोहाचा खटला भरून संपुर्ण छापखाना जप्त करण्याची तरतूद या कायद्यात होती.

लोकमान्य टिळकांनी मात्र ब्रिटिशांना न जुमानता वृत्तपत्रांच्या माध्यमातून त्यांनी ब्रिटिश राजवटी विरुद्ध जनतेत असंतोष निर्माण केला. १८९३ पासून त्यांनी परंपरागत गणेशोत्सव राष्ट्रीयतेच्या प्रचार अन प्रसाराचे माध्यम बनवले. मराठी तरुणांमध्ये राष्ट्रीय भावनेचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी १८९६ मध्ये शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली.

सरकारची होणारी मुस्कटदाबी आणि त्याकाळी पुण्यात पसरलेल्या प्लेग च्या कारवाईमुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्याचा च परिणाम म्हणून २२ जून १८९७ रोजी चापेकर बंधूनी पुण्यात प्लेग समितीचा अध्यक्ष रँड यांची आणि लेफ्टनंट आयर्स्ट यांची हत्या करण्यात आली. रँड च्या वधात टिळकांना प्रत्यक्ष गुंतवण्याची सरकारने बरीच उलाढाल केली. पण त्यांच्या विरोधात कोणताही खोटा पुरावा मिळवू करू शकले नाही.

“एका माथेफिरुचे भयंकर कृत्य” अशी टिळकांनी रँडच्या वधाची निर्भत्सना केली. अन्यायाला वाचा फोडणे लोकांना त्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यास शिकवणे हे वृत्तपत्रांचे मूलभूत कर्तव्य असल्याचे टिळक नेहमी ठणकावून सांगत असत. हा मुद्दा धरून सरकार विरुद्ध असंतोष व द्वेष पसरवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. आणि २७ जुलै १८९७ रोजी टिळकांना अटक करण्यात आली.

लोकमान्य टिळकांनी १५ जून १८९७ च्या केसरीच्या अंकात एक कविता प्रसिद्ध केली. ही कविता छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्सवात एका तरुणाने म्हटली होती. आणि त्याच उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अफझलखानाच्या वधाचे समर्थन करणारे टिळकांचे भाषण यांवर लोकमान्यांचे आरोपपत्र आधारित होते.

शिवरायांचे उद्गार या कवितेत कवीने सद्यस्थितीत परिस्थिती पाहून शिवराय आपल्या देशबांधवाना सांगत आहेत. अरे अरे मी माझ्या डोळ्यांनी माझ्या देशाचा नाश पाहत आहे. परकीय लोक जबरदस्तीने लक्ष्मी ला आपल्या करांनी ओढत आहे. तिच्यावर जुलूम करत आहेत. दृष्ट आक्का(रोगराई) सर्वत्र धुमाकूळ घालत असताना या देशाचे राजे म्हणवणारे असहाय प्याद्याप्रमाणे षंढ कसे अन का झाले.

असा कवितेचा आशय होता, सरकारी वकिलांनी असा दावा केला की अफझलखानाच्या वधाचे समर्थन करून टिळकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या करण्यासाठी उद्युक्त करत आहेत.

ब्रिटिशांनी भारतात राहण्याचा हक्क नाही त्याचा नायनाट करण्यासाठी कोणतेही शस्त्र वापरता येईल. असे आरोप त्यांच्यावर ठेवून. न्यायाधीशांनी टिळकांना दीड वर्षांच्या सक्त मजुरी ची शिक्षा दिली ते देखील लोकमान्य मुंबई कायदेमंडळाचे सभासद असताना.

Leave a Comment

You cannot copy content of this page