अफझलखानाने आपल्या ६४ बायकांची हत्या का केली?

प्रतिपदेच्या चंद्रकले प्रमाणे वाढणारे स्वराज्य रोखण्यासाठी व छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी अलिआदिलशहा दुसरा व त्याची आई बडी बेगम उलिया जनावा ताज सुलताना यांनी दरबारातील सरदारांना आव्हान दिलं. आदिलशहाचा मातब्बर सरदार अफझल खानप यांनी हसत हसत आणि मोठ्या आत्मविश्वासाने ही जबाबदारी आपल्या शिरावर घेतलेली होती.

अफजलखान म्हणजे स्वराज्यावर आलेले सर्वात मोठे संकट होते. कारण ज्या अफझल खानाने छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या ज्येष्ठ बंधूंना संभाजी राजांना कपटाने मारले, त्याच खुनशी राजकारणा चा भाग म्हणून शहाजीराजे यांना अटक झाली. तो अफझलखान स्वराज्यावर चालून आला होता.

एका मोठ्या फ़ौजेचा तो अधिकारी होता यात त्याची ताकद किती आहे ते दिसून येतं, राजकीय बुद्धिमत्ते चा वापर करून त्याने शहाजी राज्यांना अटक घडवली आणि शिवरायांचे थोरले बंधू संभाजी राजे यांची हत्या केली यांत तो किती क्रूर होता हे दिसून येतं.

शाही फर्माने आणि मोठी फौज घेऊन अफझलखान विजापूर हुन निघण्याची तयारी सुरू केली. खान मोहिमेवर निघताना त्याच्या त्याच्या गुरू कडे कौल मागण्यासाठी गेला असता गुरूकडून या स्वारीत तुला फार मोठे अपयश येणार असून तुझ्या जीविताला धोका पोहोचेल असे भाकीत वर्तविले. पण खानाला आपल्या कर्तबगारी वर जास्तच विश्वास होता म्हणून खानाने आपला बेत रद्द न करता मोहिमेवर जाण्याचे निश्चित केले.

त्यात भरीस भर म्हणजे विजापूर हुन स्वराज्यात येताना त्याच्या सैन्यदलातील निशाणी चा हत्ती म्हणजे ढालगज फत्तेलष्कर हा अचानकपणे मरण पावला. गुरूने केलेलं भाकीत आणि ढाल गजाचं प्रकरणामुळे खानाच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकायला लागली. जर गुरुंचं भाकीत खरं ठरलं तर आपल्या माघारी आपल्या ६४ बायकांचे काय होईल हा प्रश्न उभा राहिला. हा गुंता त्याने आपल्या क्रूर खुनशी वृत्ती ने संपवून टाकला.

विजापूर शहरापासून जवळ असलेल्या सुरंग बावडी नावाची एक विहीर होती त्या विहिरीत त्याने त्याच्या बायकांना बुडवून मारलं. आणि त्याच्या जवळच असलेल्या कबरींमध्ये दफन करुन टाकले. तिथे ऐकून ६४ कबरी असल्या तरी विजापूर मधला हा भाग आज ही साठकबरीया या नावाने ओळखलं जातं.

आजे अफजल खानाच्या या बायकांच्या कबरी आजही कर्नाटक मधल्या विजापूर जवळील साठकबर नावाच्या गावात अस्तित्वात आहेत. एकाच चबुतऱ्यावर ६४ समाध्या पाहताना भीतीने गाळण उडते.

8 thoughts on “अफझलखानाने आपल्या ६४ बायकांची हत्या का केली?”

  1. अफझलखानाच्या हे कृत्य फारच भयंकर आहे. पण एक शंका आहे. ही एक चालत आलेली आख्यायिका आहे, की याला कागदोपत्री काही पुरावा आहे ? किंवा काही लिहून ठेवलेला लेख वगैरे ? (अविश्वास दाखविण्याचा प्रश्न नाही, पण इतिहासाचा अभ्यास करताना आपण शक्य तितके पुरावे गोळा करत असतो, म्हणून. एक माहिती या दृष्टीने प्रश्न विचारला आहे. तरी गैरसमज नसावा. )

    Reply
    • मला वाटते, 64 कबरी एकाच चाबूताऱ्यात असणे हाच एक मोठा पुरावा असू शकतो, कारण एकाच चाबूताऱ्यात 64 कबरी तर एकाच वेळी बांधल्या गेल्या हे नक्की, मग ह्या कबरी कोनाच्या असतील? एवढ्या मोठ्या संख्येने असणाऱ्या कबरींची माहिती तर असेलच, यावरून असे म्हणता येईल की त्या 64 बायका अफझलखानच्याच असतील, आणि तसाही तो त्याच्या विकृत क्रूरतेसाठी कुप्रसिद्ध होताच.

      Reply
    • Amol Dighe अॅबे कॅरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी शिवाजी महाराजांच्या हयातीत महाराष्ट्रात आला होता, त्याने अफजलखानाने त्याच्या बायकांना विहिरीत बुडवून मारल्याची गोष्ट लिहिली आहे.. हे वर्णन foreign biographies of Shivaji या पुस्तकात आहे.

      अफजलखान जेव्हा शिवाजी महाराजांच्या विरुद्ध मोहिमेची तयारी करत होता, तेव्हा अफजलखानाला एका ज्योतिषाने सांगितले की, ‘तो या मोहिमेवरून कधीच परत येणार नाही.’ तेव्हा बेभान होऊन खानाने त्याच्या बायकांना मारले.

      Reply
  2. इतिहास तेव्हाच खरा समजण्यात येतो जेव्हा त्यामागे विविध प्रकारे शोधलेले वा सापडलेले पुरावे असतात. 64 बायकांना अफजल खानानं मारले परंतु या ठिकाणाला साठकबरी का म्हणतात दुसरं म्हणजे त्यावर मरणाऱ्या ह्या अफजलखानाच्या बायकाच होत्या हे कशावरून सिद्ध होते..

    Reply
    • Amol Dighe अॅबे कॅरे नावाचा एक फ्रेंच प्रवासी शिवाजी महाराजांच्या हयातीत महाराष्ट्रात आला होता, त्याने अफजलखानाने त्याच्या बायकांना विहिरीत बुडवून मारल्याची गोष्ट लिहिली आहे.. हे वर्णन foreign biographies of Shivaji या पुस्तकात आहे.

      अफजलखान जेव्हा शिवाजी महाराजांच्या विरुद्ध मोहिमेची तयारी करत होता, तेव्हा अफजलखानाला एका ज्योतिषाने सांगितले की, ‘तो या मोहिमेवरून कधीच परत येणार नाही.’ तेव्हा बेभान होऊन खानाने त्याच्या बायकांना मारले.

      Reply
  3. I agree thet everyone should know about Chtrapati Shivaji Maharaj. as well as Sambhaji Maharaj. Curent generation or youngester shouls also know about Indain Independence History.

    Reply

Leave a Comment

You cannot copy content of this page