एसिडिटी प्रभावी आयुर्वेदिक घरगुती उपाय

आपण निरोगी आणि स्वस्थ राहाव यासाठी आम्ही नियमितपणे आपल्या आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती घेऊन येत असतो. हि माहिती नियमीत वाचायला मिळण्यासाठी आपण आमचे फेसबुक पेज लाईक/ फॉलो करू शकता.

आज आपण एसिडिटी होण्यामागे कोणकोणती कारणे असतात; एसिडिटी झाल्यावर आपण कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो हे जाणून घेणार आहोत तसेच ह्या लेखाच्या शेवटी अशा काही विशेष दिल्या आहेत ज्या आपण केल्या तर आपल्याला होणारा एसिडिटीचा त्रास कमी होईल; त्यामुळे लक्षपूर्वक पूर्ण माहिती वाचा.

आता आपण एसिडिटी होण्यामागे कोणकोणती कारणे असतात हे जाणून घेऊयात. जर आपल्याला अवेळी जेवन करायची सवय असेल तर तसेच आपण रात्री जागरण करत असाल तर आपल्याला एसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

याशिवाय जर आपण तेलकट, मसालेदार, पचायला जड अन्नपदार्थ आपण रात्रीच्या वेळी खात असाल तर तर आपल्याला एसिडिटीचा त्रास होऊ शकतो. आता आपण एसिडिटी झाल्यावर कोणकोणते घरगुती उपाय करू शकतो हे जाणून घेऊयात.

एसिडिटी कमी होण्यासाठी आपण ताक पिऊ शकता. ताक प्यायल्याने पोटातील आम्लता कमी व्हायला मदत मिळते.. जेवण केल्यावर ग्लासभर ताकात थोडीशी मिरपूड पावडर आणि धणे मिसळून दिवसातून 3 – 4 वेळा प्या. आपल्याला आराम मिळेल.

एसिडिटी कमी होण्यासाठी आपण अर्धा चमचा ओव्याची पावडर कोमट पाण्यात मिसळून दिवसातून दोन वेळा प्या. आपल्याला आराम मिळेल.

एसिडिटी कमी होण्यासाठी आपण काकडीचे सेवन करू शकता. एसिडिटी होऊ नये यासाठी ह्या काही चांगल्या सवयी आपण स्वताला लावू शकता.

रात्रीच्या जेवणात पचायला हलके, कमी तेलकट अन्नपदार्थ खाणे, रात्रीचे जेवण झोपायच्या दोन तास आधी करणे, जेवण केल्यानंतर थोड्या वेळाने पाणी पिणे, रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करणे, सकाळी ग्लासभर कोमट पाणी पिणे, झोपायच्या आणि जेवायच्या वेळा पाळणे ह्या काही चांगल्या सवयी आपण स्वताला लावल्या तर आपल्याला एसिडिटी हा आजार होणार नाही.

आपल्याला एसिडिटी प्रभावी आयुर्वेदिक घरगुती उपाय हि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा. या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा.

महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page