अचानक हृदयविकाराचा झटका आला तर काय करावे?

आपल्या शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजेच आपले हृदय असते. आपल्या शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवाचा दर्जा आहे. आपल्या शरीरासाठी हृदय इतके महत्त्वाचे आहे. मग त्याची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे, अतिरिक्त वजन वाढल्याने अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढलेलं आपण बघतोय.

म्हणूनच आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावरील माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात अचानक हृदयविकाराचा झटका आला तर काय केले पाहिजे. सर्वप्रथम आपण हृदयविकाराचा झटका येण्याआधी कोणकोणती लक्षणे दिसू शकतात हे जाणून घेऊयात.

जर छातीत अचानक दुखत असेल तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला श्वास घेण्यात त्रास होत असेल तर समजून घ्या की त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

हृदयविकाराचा झटका येण्याआधी रक्त परिसंचरण थांबते आणि मग ऑक्सिजनच्या अभावामुळे चक्कर येऊ लागते. जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो तेव्हा काय करावे?

समजा तुमच्या जवळच्याला हृदयविकाराचा झटका आला असेल आणि तुम्ही फक्त घरी असाल तर तुम्ही काय कराल? उशीर करु नका, ताबडतोब आपल्या घरी डॉक्टरांना आणि रुग्णवाहिका बोलवा. रुग्णाला हालचाल करू देऊ नका.

आपल्या समोरच्या रुग्णाचे हृदय चालू आहे की नाही याकडे लक्ष द्या. त्यासाठी तुम्ही ताबडतोब त्याची नाडी तपासा. जर नाडी हालचाल करत असेल तर ती ठीक आहे, परंतु जर पल्सेशन चालू नसेल तर आपण त्या रुग्णाला मृत मानू नका.

आता त्याच्या छातीवर डाव्या बाजूला दाबा. आणि हे सुमारे 80 ते 100 वेळा करा. त्या व्यक्तीला तोंडाने श्वास (सीपीआर) देण्याचा प्रयत्न करा.

आपल्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला तर काय करावे? हि माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा;  अशीच आरोग्यासाठी महत्वपूर्ण माहिती वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.

ह्या माहितीमध्ये काही बदल सुचवायचे असतील तर आम्हाला मेसेज मध्ये कळवा. महत्वाची टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी प्रकाशित केला असून हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page